India Languages, asked by TamannaShaikh123786, 1 year ago

खालील मुद्यांच्या आधारे आरसा' या घटकाचे आत्मवृत्त लिहा.
मी आरसा बोलतोय
निर्मिती व शोध
आरशाचा आनट व वृत
शास्त्रीय तत्त्व
माणसाच्या चेह-यावरील भाद
हाच त्याच्या मनाचा आरसा
आरशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन
आरशाचे महत्त्व ।


Anonymous: ___k off

Answers

Answered by AadilAhluwalia
149

अरश्याचे आत्मवृत्त

खूप सुंदर दिसताय आज!

होय, खरं सांगतोय, मी तसा ही खोटं बोलत नाही ना. अर्थातच आरसा बोलतोय मी.

खरं तर माझा शोध प्रतिबिंब पाहण्यासाठी लागला होता आणि मी माझे काम आजही चोख करतोय. माझाकडे पाहायला बायकांना खूप आवडतं, बरं का? पण पुरुषही मला पाहिल्यावर आपला मोह आवरू शकत नाही. मी माणसाला त्याचं खरं रूप दाखवतो, अगदी जसं असेल तसं. कुठलीही गोष्ट माझापुढे लपत नाही.

पण माझाकडे पाहता पाहता, माणूस बाह्य सौंदर्य पाहत राहिला. मनाची सुंदरता , त्याची पारख असा भागच उरला नाही. हळू हळू माणूस चेहरा पारखून , मनाची सुंदरता बघायला विसरू लागला. आता प्रत्येक वेळा सुंदर दिसणं महत्वाचं वाटतं .

असो, माझी तर फक्त एकाच तक्रार आहे. बायका मला टिकल्या चिटकावतात. मला नाही आवडत ते. पण तरी ठीक आहे. सेवाच तर करत आलो आहे तुमची आजवर. आणि एवढं लक्षात ठेवा कि मानसाचं मन अगदी माझासारखं नाजूक असतं, तर त्याला जपा.

चला मी निघतो, ताई तयार झाल्या असतील.

Answered by Apekshita
40

मी माझी मिशी निरखत होतो. ती अस्फुट अस्फुट दिसू लागली होती. कसा आकार होईल तिचा? मला मिशी हवी थोडीशी रुंद. ओठांवरून किंचीत उतरत उतरत येणारी आणि ओठांच्या टोकावर येताच झटकन खाली वळणारी. माझ्या मीशीचा आकार मला हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन? मी कोणा कोणाला आवडेल? माझ्या डोळ्यांसमोर काही चेहरे तरळू लागेल. मी गुंग होत गेलो. खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला. मी चटकन इकडेतिकडे पाहिले. पण समोरचा आरसा मला हसत होता, हे कळायला फार वेळ लागला नाही.

"वा! वा! किती छान गुंग झाला होतास, नाही का? पण ते जाऊ दे. तुम्हा माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे!

"हे बघ. प्रत्येक माणसाचं स्वतःवरच सर्वात जास्त प्रेम असतं. आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावं म्हणून प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती, कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याच्या प्रयत्नात असतो. या धडपडीतून नच माणसाने या पृथ्वी तलावर अनंत पराक्रम गाजवले आहेत. म्हणून तर माणूस आज सर्व प्राण्यांचा राजा, या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय. या पराक्रमी माणसांनी आपल्या प्रत्येक पराक्रमानं तर आरशात स्वतःला पाहिले असणारच आणि पाहता पाहता मुठी आवळून, हात उंचावून 'माझ्या विजय असो' असं मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत स्वतःच्या जयजयकार केला असणारच, हे लक्षात ठेव. तुमच्या मनातल्या या प्रेरणेचा निर्माता मीच आहे. मीच तुमची प्रगती घडवून आणतो.

"आठवते का रे? जत्रेत आपली भेट झाली होती! किती विविध रूपात मी त्या आरसे महालात अवतरलो होतो! तू तर नुसताच लोटपोट हसत होतास. तुझ्याच किती प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या! गोलगरगरीत, हडकुळी, एकदम बुटकी, किती प्रतिमा! एका आरशातली प्रतिमा आठवते? डोक मोठ्ठं भोपळ्याएवढं, बाकीचे देह दोन अडीच फूट फक्त! काय हसत होता तुम्ही सगळेजण!

"लक्षात ठेव! ही माझी रूप केवळ विनोद करण्यासाठी निर्माण झालेली नाहीत. ड्रायव्हरला पाठीमागून येणाऱ्या गाड्या दाखवण्यासाठी मीच तर गाडीच्या कडेवर बसतो. वेगवेगळी भिंगे ही माझीच रुपं आहेत. प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शकाचा पासून अवकाशातल्या ग्रहगोलांचे निरिक्षण करणार्‍या दुर्बिणीपर्यंत सर्वत्र मीच असतो. घरात, दारात, कपड्यांवर, दुकानात, रस्त्यांवर, गाड्यांमध्ये, जत्रांमध्ये, इथे तिथे सर्वत्र मीच असतो. पण लक्षात ठेव, मी कधी स्वतःच्या राशीत राहिलो नाही.

"पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वतःलाच स्वतःचे दर्शन घडले असणार. तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे. मी स्वतःला बाजूला ठेवून माणसाला मदत केली आहे. तू सुद्धा अशीच मदत करीत राहा. पाहा, केवढा मोठा होशील तू!"

Hope it will help you and also other's...

Similar questions