Social Sciences, asked by atish03p, 1 month ago

खालील मुद्याच्या आधारे कथा पूर्ण करुन लिहा.
एक गाद - रमेश नावाचा मुलगा-शाळेत जाणे. शाळेतील झाडावर फळे - मुलांचे झाडावरील फळे
चोरणे-शिक्षकांची सुचना-चोरीबद्दल विचारपुस - मुलांना समान उंचीच्या काठ्या देणे - चोरी
करणान्याची काठी दोन इंचानी वाडेल - काठी तोडणे - चोरी उघडकिस येणे.​

Answers

Answered by siddhi710
21

● फळांची चोरी ●

एक रामपूर नावाचे गाव होते. त्या गावात रमेश नावाचा एक मुलगा राहत होता. रमेश अभ्यासात अतिशय हुशार , साधा भोळा आणि प्रामाणिक मुलगा होता. म्हणुन तो सर्व शिक्षकांचा लाडका विद्यार्थी होता.

एकदा रमेश शाळेत गेला. त्यांनी पाहिले की काही मुले शाळेतील फळ झाडांवरील फळे चोरत होती. पण रमेश काहीच न बोलता शांत उभा राहिला. तेवढ्यात वर्गातून एक शिक्षक बाहेर आले. त्यांनी पाहिले की झाडाची फळे कोणी तरी तोडली होती. शिक्षकांचा विचारपूस केली. पण फळे तोडणाऱ्या आगाऊ मुलांनी रमेश च्या साध्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेतला आणि रमेश कडे बोट दाखवले. शिक्षकांची सुचना होती की कोणीही शाळेच्या झाडांची फळे तोडायची नाहीत.

पण शिक्षकांचा मात्र रमेश वर पूर्ण विश्वास होता. त्यांना माहित होते के रमेश अस काही करणार नाही. शिक्षकांनी चोरी करणार्‍या धडा शिकवायचा ठरला.

त्यांनी प्रत्येकाला समान उंचीची काठी दिली. आणि मुलांना सांगितल की ज्यानी चोरी केली असेल त्याची काठी दोन इंचांनी वाढेल. पण ज्या मुलांनी चोरी केली होती त्यांनी भीती च्या भरात शिक्षकांनी काय सांगितलं ते न ऐकताच काठी तोडली.

शिक्षक व बाकी सर्वांच्याच लक्षात आले चोरी कोणी केली ते.

चोरी करणार्‍या विद्यार्थ्यांनी आपली चोरी सर्वांसमोर मान्य केली आणि रमेशची माफी मागितली.

तात्पर्य :- कधिही खोटे बोलू नये आणि आपली चूक दुसऱ्यांवर ढकलू नये. ☘

Similar questions