१) खालील मुद्यांच्या आधारे माहितीपत्रकाचे स्वरूप स्पष्ट करा.
Answers
Answer:
माहितीपत्रक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण माहिती देणारे परिचयात्मक पत्रक होय. माहितीपत्रक हे एक प्रकारे उत्पादने. सेवा, संस्था लोकांपर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे. नवनव्या योजनांकडे, उत्पादनांकडे, संस्थांकडे लोकांनी डोकावून पाहावे यासाठीची ती एक खिडकी आहे. जनमत आकर्षित करण्यासाठी ते एक लिखित स्वरूपाचे जाहीर आवाहन असते. माहितीपत्रकामुळे माहिती देणारा आणि माहिती घेणारा यांच्यात एक नाते निर्माण होण्यास मदत होते. नवीन ग्राहक मिळवण्याची, नवीन बाजारपेठ काबीज करण्याची ती पहिली पायरी आहे. माहितीपत्रकामुळे ग्राहकाला हवी असलेली माहिती ग्राहकाकडे सतत उपलब्ध राहू शकते. माहितीपत्रक कमी वेळात, कमी खर्चात ग्राहकांपर्यंत घरबसल्या पोहोचवता येते. माहितीपत्रक हे अप्रत्यक्षपणे जाहिरातीचे कार्य करते. माहितीपत्रक वाचताक्षणीच लोकांच्या मनात कुतूहल, उत्कंठा, औत्सुक्य जागे झाले, की समजावे माहितीपत्रकाचा हेतू साध्य झाला आहे.
Please add me as a brain list