World Languages, asked by Anonymous, 7 months ago

खालील मुददयांच्या आधारे 'संतकृपा झाली' या कवितेचे रसगृहण करा.
मुददे - १. कवी / कवयित्री, २. कवितेचा विषय -
३. कवितेतील आवडलेली ओळ ४. कवितेतून मिळणारा संदेश -
५. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे​

Answers

Answered by BrundansaiCH
52

Answer:

Answer:

the answer is below :

Explanation:

राधाकृष्ण भगवानराव दुधाडे उज्जैन

काव्य प्रकार अभंग

शीर्षक : संतकृपा झाली

संत बहिणाबाई

रसग्रहण – : वारकरी संप्रदायरूपी मंदिराची उभारणी कशी व कोणी केली यासंदर्भात हा अभंग लिहिलेला आहे . वारकरी संप्रदायातील संत कवयित्री बहिणाबाई या संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या होत . भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार त्यांच्या अभंगातून आढळतो . अभंग या छंदात प्रस्तुत कविता आहे

वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे बहारदार रूपकात्मक वर्णन या अभंगात केले आहे . संतांचा वाटा किती मोलाचा आहे हे दिसून येते आणि या इमारतीची जपवणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेची आहे .संतांची कृपा झाली व त्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली , फलद्रूप झाली असा आशय या ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. संतांबद्दलचा बहिणाबाईंच्या मनातील परम आदरभाव येथे दृष्टीस पडतो .

या अभंगाची भाष साधी व सोपी आहे . इमारतीचे यथोचित रुपक योजिले आहे . संत ज्ञानेश्वर हे पाया , संत नामदेव हे भितींचे दगड , संत एकनाथ हे खांब आणि संत तुकाराम महाराज हे मंदिराचा कळस अशी वारकरी संप्रदायाची थोर परंपरा विशद केली आहे . सर्व सामान्य माणसाला उमजेल असा अभंग हा लोकछंद सहजपणे वापरला आहे . संतकृपेची महती लोकमानसात सोप्या भाषेत बिंबवली आहे

Answered by rajraaz85
6

कवितेचे नाव -संतकृपा झाली

कवितेची कवयित्री- संत बहिणाबाई

कवितेचा विषय- कवितेच्या माध्यमातून संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदाया ला एक रूपकात्मक पद्धतीने सादर केलेले आहे. कवितेच्या माध्यमातून संत बहिणाबाई सांगतात की संत ज्ञानेश्वर हे या वारकरी संप्रदायाचा पाया आहेत. त्यानंतर संत नामदेव आणि संपूर्ण भारतभर या संप्रदायाचा विस्तार करून भक्कम अशा भिंती बांधल्या. संत एकनाथांनी या भिंतींना बळकटी यावी म्हणून आपल्या योगदानाने भक्कम अश्या खांब उभे केले तर संत तुकाराम यांनी या संपूर्ण अशा केलेल्या कार्यावर आपल्या अभंगांच्या माध्यमातून व आपल्या योगदानाने कळस चढवला असे संत बहिणाबाई सांगतात.

कवितेतील आवडती ओळ:

तुका झालास कळस| भजन करा सावकाश|

संत तुकाराम यांच्या योगदानाने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी लोकांना संत ज्ञान दिले व जनजागृती घडवून आणली त्यामुळे खऱ्या अर्थाने तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे कळस आहेत असे म्हणता येईल म्हणून ही ओळ मला खूप आवडते.

कवितेतून मिळालेला संदेश- महाराष्ट्रात असलेली वारकरी संप्रदायाबद्दल कवयित्री आपल्याला सांगतात.

कविता आवडण्याचे कारण-

वारकरी संप्रदायाचा विस्तार संत ज्ञानेश्वरांपासून नामदेव एकनाथ तुकाराम पर्यंत कसा झाला व त्याचे किती महत्त्व आहे हे संत बहिणाबाई आपल्याला पटवून देतात.

संतवाणी बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा-

https://brainly.in/question/20408684

https://brainly.in/question/27410685

#SPJ3

Similar questions