खालील ओळींचे रसग्रहण करा
' घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले '
Answers
Answer:
उत्तर : आशयसौंदर्य : सुप्रसिद्ध मराठी गीतकार जगदीश खेबुडकर
यांची 'आकाशी झेप घे रे' ही मराठी चित्रपटातील एक गीतरचना आहे.
स्वसामर्थ्यावर अदम्य विश्वास ठेवून कर्तृत्वाचे मोकळे आकाश ओळखावे
आणि ध्येयाकडे उंच भरारी घ्यावी, परावलंबित्व सोडून स्वावलंबी व्हावे,
ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. स्वकर्तृत्वाने यशाचे शिखर
गाठावे व उच्च ध्येयाकडे झेप घ्यावी. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचे
मोल जाणावे, हा अमूल्य संदेश ही कविता देते.
काव्यसौंदर्य : वरील ओळींमध्ये कवींनी श्रमाचे महत्त्व सांगितले
आहे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. अविरत प्रयत्न व
काबाडकष्ट करून जेव्हा शेतकरी शेतामध्ये खपतो, तेव्हा त्याला
मोत्यांसारखे पीक मिळते. त्याच्या घामातून मोती फुलतात. ते धनधान्य
त्याच्या घरी येते, तेव्हा त्याच्या श्रमाचे सार्थक होते. जणू श्रमदेव
त्याच्या घरी अवतरतात.
भाषिक वैशिष्ट्ये : ध्रुपद व कडवी अशी या गीताची सुटसुटीत
रचना आहे. रसाळ शब्दकळा व नेमके मर्म सांगणारी भाषा हे या
कवितेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. 'पिंजरा' हे सुखलोलुपतेचे प्रतीक
वापरले आहे व त्यात कैद झालेल्या मानवी मनाला 'पक्षी' म्हटले
आहे. साध्या शब्दांत गहन आशय मांडला आहे. यमकप्रधान गेय
रूपामुळे कविता मनात ठसते.