खालील ओळींचे रसग्रहण करा. ‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ।। भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।।’
Answers
Answered by
24
Answer:
'अंकिला मी दास तुझा' या अभंगात संत नामदेवांनी आई-बाळ, पक्षीण-तिची पिल्ले, गाय-वासरू, हरिणी-तिचे पाडस अशा विविध उदाहरणांतून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे.
आई आणि मुलाचे नाते अत्यंत जवळचे, जिव्हाळ्याचे असते, म्हणून पक्षीण जरी आकाशात विहार करत असली तरी आपली पिल्ले जमिनीवर कोसळताच ती लगेच खाली झेप घेते. भुकेले वासरू जेव्हा हंबरू लागते तेव्हा गायही सारे काही सोडून हंबरत आपल्या पिल्लाकडे धाव घेते.
अशाप्रकारे, संतकवी नामदेव परमेश्वर व स्वत:च्या नात्यातील प्रेमभाव पक्षीण व तिची पिल्ले, गाय व तिचे वासरू या उदाहरणांद्वारे स्पष्ट करत आहेत.
Explanation:
Similar questions