India Languages, asked by sarthak27gawade, 5 months ago

खालील ओळींचे रसग्रहण करा( या विश्वाची विभव संपदा
जपू वायू आम्ही पादा)​

Answers

Answered by ruthescobal1987
1

Answer:

mechopo meme quepoh

ye mechopo meme quepoh

meke pohhh uuuuhhhhh

Answered by rajraaz85
1

Answer:

"या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा"

या कवी किशोर पाठक यांच्या 'करू स्वप्न साकार' या कवितेतील आहेत. कवी किशोर पाठक या कवितेच्या माध्यमातून आपण देशाला कसे वैभवशाली बनवू शकतो व त्यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल आपले मत व्यक्त करतात.

Explanation:

कवी  म्हणतात की आपण साऱ्यांनीच अथक प्रयत्न केले तर कृषी आणि औद्योगिक क्षेत्रात क्रांती आणू शकतो. या विश्वामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परमेश्वराने नैसर्गिक संपत्ती दिली आहे. आणि त्या नैसर्गिक संपत्तीचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. परमेश्वराने दिलेली नैसर्गिक संपत्ती व्यवस्थित रित्या आपण जपली पाहिजे आणि मानव कल्याणासाठी त्याचा वापर केला पाहिजे. निसर्गाचा ऱ्हास न होता त्या नैसर्गिक संपत्ती ला आपण कसे वाढवू शकतो याचाच प्रयत्न प्रत्येक मानवाने केला पाहिजे. कारण परमेश्वराने दिलेल्या नैसर्गिक संपत्तीला आम्हाला जपायचे आहे आणि त्याचबरोबर तिला लाख पटीने वाढवायचे आहे. असा अनमोल सल्ला कवी आपल्या कवितेच्या या सुंदर ओळींच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात.

Similar questions