४. खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(अ) पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात.
(आ) पाच मिनिटांतच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली.
(इ) वेलींचेही अंगधुणे झाले होते.
(ई) त्या भाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.
Answers
(अ)= रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते .पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नाची पूर्ण समाप्ती होते
(आ)== हॉटेलचा स्वागतकक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री-अपरात्री लेखक होटलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जगरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या.लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले.
(इ)== सागर बीच हॉटेलभवतालाची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. फुलांनी बहरलेली रोपटी पहाटे पाहुण्यांकडे मिस्कीलपणे डोळे मिचकावीत पाहत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते.
(ई)== पूर्वी राजदरबारी गायक असत . ते गाऊन राजांचे मनोरंजन करीत. या गायकांना 'भाट' म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत . पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही, म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरुप भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरुन काढली.