खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा.
मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी हे अन्न मी सेविनार
Answers
Answered by
13
जेवण जेवताना विचार करा की हे जेवण मी कशा साठी जेवत आहे . आपण का सेविनार कारण आपल्याला पोषण , ताकद मिळाली पाहिजे म्हणून जेवण जेवले पाहिजे .
Answered by
2
Answer:
एखाद्या देशात जन्म घेतल्यानंतर त्या देशातील अन्न खाऊन आपल्याला देशाची सेवा कशी करता येईल असा उत्कट भाव कवी या ओळींच्या माध्यमातून स्पष्ट करतात.
कवी म्हणतात ज्या वेळेस आपण अन्न ग्रहण करतो त्यावेळेस तो घास आपण का खावा, हे अन्न का सेवन करावे असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात आणि त्याचे उत्तर हे एकच असते की आपण सेवन केलेले अन्न ज्या भूमीतून निर्माण झालेले आहे त्या भूमीच्या रक्षणासाठी आपण सदैव तयार राहिले पाहिजे.
देशाची सेवा माझ्या हातून घडू दे, तसेच धर्मरक्षणासाठी मी नेहमीच तयार राहिला पाहिजे त्यासाठी खाल्लेल्या अन्नामुळे मला शक्ती मिळू दे अशी प्रार्थना कवी आपल्या कवितेच्या माध्यमातून करतात.
Similar questions