खालील पैकी कोणताही एक निबंध लिहा
१] परीक्षेचा पहिला दिवस
Answers
Answer:
परीक्षेचा पहिला दिवस.
परीक्षेचा पहिला दिवस असणे म्हणजे तो दिवस त्या दिवशी आपण केलेल्या मेहनत आणि अभ्यास याचा आपण कसा वापर करतो. परीक्षा असली कि जवळपास सर्वच विध्यार्थ्यांना भीती वाटत असते आणि अनेक घाबरवणारे प्रश्न मना मध्य येत असतात. आपण केलेलय अभ्यासापैकीच येणार का ? मला पेपर मध्य आठवेल का ? मी पुरेसा सराव केला आहे का ? किती गुण मिळतील ? स्वताची तुलना दुसऱ्यानं सोबत करणे , माझ्या मैत्रिणाचा /मित्राचा किती अभ्यास झाला असेल ? असे हजारो प्रश्न मनात येत असतात.
आणि माझी हि हालत अशीच काही तरी झाली होती , परीक्षा आहे म्हणून सतत डोक्यात परीक्षेचे विचार येत असतात . आणि थोडी चिंताग्रस्त अशी स्थिती होती. पेपर च्या दिवशी सकाळी तर अजूनच मन खळबळ होती. पेपर सकाळी ११ वाजता जरी असला तरी मनाची तयारी हि खूप आधी पासूनच करावी लागते. मी मला लागणारे सर्व साहित्य घेतले घरात सर्वांचा आशीर्वाद घेऊन पेपर साठी निघाले. सेंटर वर गेल्यावर इतर शाळेच्या हि विध्यार्थी आले होते . पण भरपूर सराव केला असेल तर इतर विध्यार्थी , शिक्षक , किंवा सेंटर यांचा काहीच परिणाम होत नाही. पेपर आला आणि शांत मानाने वाचला आणि सोडवायला सुरुवात केली ,हळू हळू आपण त्या वातावरण शी आपल्याला जुळवून घेतो आणि सवय होती. आपल्याला नंतर वाटते आपण उगीच घाबरत होतो परुंतु आयुष्यमध्य अशेच काही घटना / प्रसंग असतात जे नेहमी आपल्या आठवणीत राहतात.