खालील प्रश्नाचा एका
१. गावोगाव पाण्याचे टँकर का पुरवावे लागते?
1080sersorwesses
Answers
Answer:
पाण्यासाठी रोज १५ हजारांचा खर्च
अडीच तास पाणी; त्यात दाबही कमी
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई
पाणीकपातीमुळे मुंबईतील अनेक गृहनिर्माण संस्थांना दररोज खासगी टँकरच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. अंधेरी पश्चिम येथील गोदी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या दोन्ही टॉवरसाठी पाण्याच्या स्वतंत्र लाइन असून, कपातीआधी दररोज सकाळी अकरा ते दुपारी अडीच या वेळेत पाणीपुरवठा होत असे. त्यावेळी सोसायटीला पाण्याची चणचण भासत नव्हती. मात्र कपातीनंतर पाण्याची वेळ एक तासाने कमी झाली आहे. पुरवठ्यादरम्यान पुरेसा दाबही नसतो. त्यामुळे कुणालाही पुरेसे पाणी मिळत नाही. बहुसंख्य घरांमध्ये एक किंवा दोनपेक्षा बादल्यांपेक्षा अधिक पाणी मिळत नाही. त्यामुळे सोसायटीला दररोज चार ते पाच टँकर पाणी विकत घ्यावे लागते आहे.
अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर मेट्रो स्टेशनजवळ गोदी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मधुवन नावाचे दोन टॉवर आहेत. सी-एक या १८ मजली टॉवरमध्ये ८५ कुटुंबे असून सी-दोन या १६ मजली टॉवरमध्ये ९१ कुटुंबे राहातात. पाणीकपातीनंतर या दोन्ही टॉवरमधील रहिवाशांचे पाण्यावाचून अक्षरशः हाल सुरू आहेत. रोज पाच टँकर पाणी विकत घ्यावे लागत असून, टँकरसाठी सोसायटीला रोज अंदाजे १५ हजार रुपये मोजावे लागत आहेत, अशी माहिती सोसायटीतील रहिवासी अजित पाडगावकर यांनी दिली. परिसरातील काही सोसायट्यांनी पाणी खेचण्यासाठी बुस्टर पंप लावले आहेत. त्यामुळे आमच्या सोसायटीत पुरेसे पाणी येत नसावे, पाणी कमी येण्यामागे हे एक कारण असावे, असा अंदाज पाडगावकर यांनी व्यक्त केला आहे.
पाणी खेचण्यासाठी पंप
मागील दीड महिन्यापासून आमच्या सोसायटीत तीव्र पाणीटंचाई भासते आहे. तसेच मागील अनेक वर्षांपासून सोसायटीत दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत पालिकेकडे वेळोवेळी तक्रार केल्यानंतरही लक्ष देण्यात आले नाही, अशी माहिती मालाड येथील इनामदार इस्टेट चाळीतील रहिवासी मिलिंद हिरवाळे यांनी दिली. पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाणी खेचण्यासाठी रहिवाशांनी पंप बसवले आहेत, असे हिरवाळे यांनी सांगितले.