History, asked by kailassanp1985, 1 month ago

खालील प्रश्नांची शोडक्यात उत्तरे लिहा. क्षेत्राभेटी दरम्यान प्रश्नावली चे महत्व विशद कर

Answers

Answered by aditya23kasare
4

Answer:

प्रकल्पासाठी आवश्यक असलेली माहिती ही संदर्भ साहित्य, निरीक्षणे, प्रयोग, सर्वेक्षण अशा वेगवेगळ्या पद्धतीने मिळवता येते. यापूर्वीच्या भागामधून आपण सर्वेक्षण कसं करावं, याविषयी माहिती घेतली. सर्वेक्षण दोन प्रकारे केलं जातं. पहिला प्रकार म्हणजे क्षेत्रअभ्यास तर दुसरा प्रकार म्हणजे प्रश्नावली व मुलाखती हा होय.

प्रकल्पाच्या विषयाच्या संदर्भात समाजातल्या वेगवेगळ्या थरांतील अनेक व्यक्तींकडून जेव्हा माहिती मिळवायची असते, तेव्हा ती प्रश्नावलीच्या माध्यमातून मिळवता येते. विशेषत: पारंपरिक ज्ञान आणि दैनंदिन जीवनात त्याचा केला जाणारा वापर याविषयी माहिती मिळवण्यासाठी ही पद्धत प्रभावीपणे वापरता येते.

Similar questions