खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) ढग कशाचे बनलेले असतात ?
Answers
Answer:
hindi me bataaye pls to me answer de pau
Answer:
Explanation:
भूपृष्ठावरील आर्द्रतायुक्त हवा अनेक कारणांमुळे वर वर जाऊ लागते. तप्त जमिनीचे सानिध्य, पर्वत किंवा टेकडी सारखी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती, अशा अनेक कारणामुळे अशा हवेला ऊर्ध्वगामी दिशा मिळते.
वर गेल्यावर ही हवा प्रसरण पावते आणि त्यामुळे आणखी हलकी होते. तिच्यावरील दाबही कमी होतो आणि ती अजूनच वर वर जाऊ लागते. अशी ती वर वर जात असताना तिचे आंतरिक प्रसरण होते आणि ती थंड होऊ लागते..
हवा थंड होऊ लागल्यामुळे तिची सापेक्ष आर्द्रता वाढत जाते.
विशिष्ट उंचीवर गेल्यावर ती संपृक्त बिंदू गाठते.
वातावरणात अनेक अदृश्य व सूक्ष्म असे धूलिकण व धूम्रकण इतस्ततः संचार करत असतात. असे कण आर्द्रताग्राही असतात. हवा अजून वर जात राहिल्यास हवेचे म्हणजेच त्यातील जलबाष्पाचे तापमान द्रवांकाच्याही खाली जाऊन अशा सूक्ष्म कणांवर जलबाष्पाचे संद्रवण किंवा द्रवीकरण होते आणि पाण्याचे थेंब तयार होतात. असे असंख्य जलबिंदू एकत्र आल्यावर त्यांचा दृश्य स्वरूपातला ढग तयार होतो.