खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
१. कष्टकऱ्यांना कोणते एकच इमान माहिती आहे ?
Answers
कष्टकरी ही निसर्गाची कामे आहेत. कष्ट करणे हा त्यांचा धर्म आहे. परिश्रम केल्यावर फळ; हे कष्ट , परिश्रम चिकाटीने व श्रद्धेने सतत करावे . कष्टकरी या कष्टावर विश्वास ठेवतात. श्रद्धेने घाम गाळण्याचे काम करतात . त्यांचे इमान , त्यांची निष्ठा कष्टच वाहिलेली असते . कष्ट करणे हे त्यांचे ध्येय असते . घाम येईपर्यंत अखंड , अविरत कष्ट करणे , हेच कष्टाचे व्रत कष्टकरी पाळतात .
म्हणूनच म्हटले आहे —
" इमान आम्हाच ठावे
घाम गाळून काम करावे "
Answer:
कवी वसंत बापट यांनी 'आभाळाची आम्ही लेकरे' या कवितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक कष्टकरी व्यक्तीचे जीवन आपल्या शब्दांतून रेखाटले आहे. कवी म्हणतात समाजात कष्ट करणाऱ्या व्यक्तींच्या कष्टा वरच या समाजाची प्रगती अवलंबून असते. कारण कष्ट करणारा हा प्रत्येक व्यक्ती अगदी इमाने इतबारे आपले काम करत असतो. तो आपल्या कामाशी, मेहनती शी अगदी प्रामाणिक असतो. समाजात कष्ट करणारा प्रत्येक व्यक्ती हा स्वतःला निसर्गाची लेकरे मानतो व त्या निसर्गाने सोपवलेले काम हे अतिशय कष्टाने, इमानदारीने आणि सचोटीने पूर्ण करण्याचा तो प्रयत्न करत असतो. काम हेच आपले ध्येय, धर्म आणि श्रद्धा आहे असे तो मानतो. दिलेले काम पूर्ण करण्यासाठी तो इमानाने अतोनात प्रयत्न करत असतो कारण त्याचा जन्म हा इमानदारीने कष्ट करण्यासाठी झाला आहे असे तो मानतो. म्हणूनच कवी कष्टकऱ्यांच्या भावना आपल्या शब्दात सांगतात, आमचा इमानच आमचे सर्व काही आहे आणि तो इमान जपण्यासाठी आम्ही घाम गाळून काम करायला तयार आहोत. म्हणून कष्ट करणे हे एकच इमान कष्टकऱ्यांना माहित आहे