CBSE BOARD X, asked by chavanshraddha413, 1 month ago

खालील शब्दांच्या आधारे कथालेखन करा शेत डोंगर, धरण, शेतकरी, मुलगा​

Answers

Answered by prabh5664
11

Answer:

Photosynthesis is the process in which plants make their food in the presence of carbon dioxide and water.

Answered by rajraaz85
2

मेहनतीचे फळ -

एकदा एका गावात एक शेतकरी राहत होता. अगदी छोटे वस्ती असलेले ते गाव होते. गावामध्ये शंभू महादेवाचे एक छोटेसे व सुंदर असे मंदिर होते. गावातील लोकांची महादेवावर खूप श्रद्धा होती. डोंगराच्या पलीकडे एका छोट्याश्या झोपडीमध्ये शेतकरी व त्याचे कुटुंब राहत होते.

शेतकरी शेती करून त्याचा उदरनिर्वाह करित होता. शेतकऱ्याला एक मुलगा होता. त्या मुलाला व कारभारणीला घेऊन तो रोज शेतात जात असे. शेताच्या बाजूला एक होते. धरणाला खूप पाणी होते. आजूबाजूची शेते हिरवीगार होती. मुलाला शिकण्याची खूप आवड होती पण परिस्थिती बिकट असल्यामुळे त्याला शिक्षण घेणे अवघड होते. पण त्याला लिहिता वाचता येत होते. शाळेत जाणे त्याला जमत नव्हते. म्हणून शाळेच्या बाहेर बसून गुरुजींचे सर्व शब्द त्याच्या कानावर पडून ऐकून तो हे सर्व शिकला.

एक दिवस शाळेच्या बाहेर तो एक रस्त्यावर पडलेला पेपराचा तुकडा हातात घेऊन काहीतरी वाचत होता. तेवढ्यात शाळेतील मास्तरांचे त्याच्याकडे लक्ष गेले. मास्तरांनी बघितले मुलगा हुशार दिसतो. ते त्याच्या जवळ गेले. आणि विचारले शाळा का नाही शिकत. त्यावेळेस त्याने उत्तर दिले शाळेत जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही. आमची परिस्थिती जेमतेम आहे. ते ऐकून मास्तरांना खूप वाईट वाटले. त्यांनी ठरवले त्याच्या वडिलांना एकदा भेटले पाहिजे एक दिवस ते शेतकर्‍याच्या घरी गेले. आणि त्यांनी सर्व हकीकत त्याच्या वडिलांना सांगितली.

वडील बोलले हो त्याला खरच शिक्षणाची खूप आवड आहे. पण काय करणार हातात पैसा नसल्यामुळे मी परिस्थितीपुढे हतबल आहे. तेव्हा मास्तरांनी सांगितले, यापुढील त्याच्या सर्व शिक्षणाचा खर्च मी करणार तुम्ही काळजी करू नका शेतकऱ्याला ते ऐकून फार बरे वाटले.

मुलाने मन लावून अभ्यास करून मोठी पदवी संपादन केली. गावात त्याचा सत्कार करण्यात आला. हे सर्व बघत असताना त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.

Similar questions