खालील शब्दसमुहाबद्दल एक शब्द लिहा.
१] ज्यास कोणाचा आधार नाही असा=
२]खुप वय असणारा=
३] अतिशय आनंद=
४]स्वतःवरचा ठाम विश्वास=
५]एका अंगाने केलेला विचार=
६]घरात राहणारी स्त्री=
७]संतांची आपल्यावर असलेली कृपा=
८]देवासाठी तयार असलेले आलय=
९]राजाचा वाडा=
१०] कमी बोलणारा =
११]केलेल्या उपकाराची जाणीव नसणारा =
१२] कंठ निळा असलेला =
१३] धर्म पाळणारा=
Answers
Answered by
5
Answer:
१) ज्यास कोणाचा आधार नाही असा → निराधार
२) खूप वय असणारा → वयोवृद्ध
३) अतिशय आनंद → परमानंद
४) स्वतः वरचा ठाम विश्वास → आत्मविश्वास
५) एका अंगाने केलेला विचार → एकांगीविचार
६) घरात राहणारी स्त्री → गृहिणी
७) संतांची आपल्यावर असलेली कृपा → संतकृपा
८) देवासाठी तयार असलेले आलय → देवालय
९) राजाचा वाडा → राजवाडा
१०) कमी बोलणारा → मितभाषी
११) केलेल्या उपकाराची जाणीव नसणारा → कृतघ्न
१२) कंठ निळा असलेला → निळकंठ
१३) धर्म पाळणारा → धार्मिक
Similar questions
Math,
5 months ago
Science,
5 months ago
Sociology,
5 months ago
Social Sciences,
11 months ago
Math,
11 months ago
Political Science,
1 year ago