India Languages, asked by MrunaliTambe, 4 months ago

●खालील शब्दसमूहांचा/वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(अ) चिंतेत पडणे.
(ई) अचंबा वाटणे .
(आ) गहिवरून येणे.
(उ) पोटतिडकीने बोलणे,
(इ) डोळे पाणावणे.
(ऊ) रक्ताचे पाणी करणे.
Please Give the answer in Marathi ​

Answers

Answered by mad210216
9

वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग:

Explanation:

  • चिंतेत पडणे - काळजी वाटणे.
  • वाक्य: शाळा सुटून दोन तास झाले, तरी प्रीती घरी आली नाही, त्यामुळे आई चिंतेत पडले.

  • अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे.
  • वाक्य: उन्हाळाच्या दिवसांमध्ये अचानक पडलेल्या पावसामुळे सगळ्यांनाच अचंबा वाटला.

  • गहिवरून येणे - रडू येणे.
  • वाक्य:लग्न करून सासरी जात असलेल्या आपल्या मुलीला पाहून आईला गहिवरून आले.

  • पोटतिडकीने बोलणे- मनापासून बोलणे.
  • वाक्य: निर्दोष समीर आपली बाजू मांडताना पोलिसांसमोर पोटतिडकीने बोलत होता.

  • डोळे पाणावणे - डोळ्यांमध्ये अश्रु येणे.
  • वाक्य: गरीब सीमाच्या घराची स्तिथी पाहून तिच्या श्रीमंत मैत्रिणीचे डोळे पाणावले.

  • रक्ताचे पाणी करणे - भरपूर कष्ट करणे.
  • वाक्य: कठीण परिस्थिती असूनही शेतकरी त्याच्या शेतात रक्ताचे पाणी करून पीक पिकवत असतो.
Similar questions