खालील शबदांचा वापर करून जहिरात तररकस करा
उपयुकर औषध खोकला ,सदी, अपवेदिक रामबाण अडुळसासव
Answers
Answer:
मुंबई: सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. सर्दी-खोकल्यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे घरगुती उपाय असतात.
आणखी वाचा - ६ खास टिप्स: दाट, मऊ आणि चमकदार केसांसाठी
या घरगुती उपयांमुळे आपण सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकता.
दूध आणि हळद: गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.
आल्याचा चहा: आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.
लिंबू आणि मध: लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.
लसूण: लसूण सर्दी-खोकल्याशी लढण्यात मदत करतं. लसणात एलिसिन नावाचं एक रसायन असतं जे अँटी बॅक्टेरियल, अँटी वायरल आणि अँटी फंगल असतं. लसणाच्या पाच कळ्या तुपात भाजून खाव्या. असं एक-दोन वेळ्या केल्यानं आराम मिळतो. सर्दी-खोकल्याचं संक्रमण लसून झपाट्यानं दूर करतं.
तुळशीची पानं आणि आलं: तुळस आणि आलं सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. याच्या सेवनानं लगेच आराम पडतो. एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पानं, त्यात आल्याचा एक तुकडा टाकावा. त्याला काही वेळ उकळून काढा तयार करावा. जेव्हा पाणी अगदी अर्ध होईल, तेव्हा तो काढा प्यावा. लहानांसोबत मोठ्यांसाठीही हा उपाय फायद्याचा ठरेल