खालील दिलेल्या कवितेतील ओळीचे रसग्रहण करा धरिला पंढरीचा चोर ।
गळा बांधोनिया दोर ।।१।।
हृदय बंदिखाना केला ।
आंत विठ्ठल कोंडीला।।२।।
Answers
Answered by
4
Answer:
आशयसौंदर्य: श्रीविठ्ठलाचे प्रेम व जवळीक सदैव लाभावी म्हणून त्याला हृदयाच्या बंदिखान्यात कायम कोंडून ठेवणे, हा आशय व्यक्त करणारा ‘धरिला पंढरीचा चोर’ हा संत जनाबाई यांचा वेगळा अभंग आहे. भक्त आणि परमेश्वराचे दृढ नाते कसे असावे, याची शिकवण या अभंगातून जनसामान्यांना मिळते.
काव्यसौंदर्य: श्रीविठ्ठलाचा कायम सहवास मिळावा म्हणून या पंढरीच्या चोराला मी पकडले आहे व त्याला माझ्या हृदयाच्या कैदखान्यात डांबून ठेवले आहे. असे संत जनाबाई निरागसपणे सहज म्हणतात. भक्तिरसाचे उत्कट उदाहरण या ओळींमधून प्रत्ययाला येते. श्रीविठ्ठल निरंतर मनात राहावा, म्हणून हे लटके भांडण अतिशय लोभसवाणे झाले आहे.
Similar questions