खालील उपप्रश्न सोडवा : (कोणतेही पाच)
(15)
अवशेषांगे म्हणजे काय ?
ii) कोणत्याही दोन मानवी अवशेषांगांची नावे लिहा.
iii) कोणतेही एक मानवी अवशेषांग इतर प्राण्यांसाठी
कसे उपयुक्त आहे, ते लिहा.
) सेंद्रिय शेतीमध्ये जैव कीटकनाशकांचे महत्त्व स्पष्ट करा.
Answers
Answer:
अवशेषांगे म्हणजे काय ?
= सजीवांमधील र्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना 'अवशेषांग' म्हणतात. बदलणार्या किंवा भिन्न पर्यावरणात जगण्यासाठी सजीवांत अचानक नवी ऊती, अंगे किंवा इंद्रिये उत्पन्न होऊ शकत नाहीत. जुन्याच इंद्रियांत क्रमाक्रमाने बदल घडून येतात.
कोणत्याही दोन मानवी अवशेषांगांची नावे लिहा.
=. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणार्या आणि सेल्युलोजचे पचन करू शकणार्या समान प्राण्यांसाठी एक उपयुक्त, कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असलेले कानाचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलविण्याकरिता उपयुक्त असतात. माकडहाड, अक्कलदाढा, अंगावरील केस, पुरुषांना असलेले अल्पविकसित स्तन अशी अनेक अवशेषांगे मानवाच्या शरीरात दिसून येतात.
कोणतेही एक मानवी अवशेषांग इतर प्राण्यांसाठीकसे उपयुक्त आहे, ते लिहा
=. मानवाला निरुपयोगी असणारे आंत्रपुच्छ हे रवंथ करणार्या आणि सेल्युलोजचे पचन करू शकणार्या समान प्राण्यांसाठी एक उपयुक्त, कार्यक्षम अवयव आहे. याचप्रमाणे मानवाला निरुपयोगी असलेले कानाचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलविण्याकरिता उपयुक्त असतात.