खालील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा : 'सामाजिक कविता' हा अनेक कविताप्रकारांपैकी एक कविताप्रकार आहे. कवितेतील विषय आणि आशय लक्षात घेऊन तो मानला जातो. अर्थात अभ्यासाच्या सोयीमधूनच हा आणि अशा प्रकारचे इतर कविताप्रकारही कल्पिले गेले आहेत. सामाजिक कविता म्हणजे केंद्रस्थानी समाजजाणीव असलेली कविता होय. कोणत्याही एका समूहजाणीवेला, समूहाच्या व्यथेला, दुःखाला आपल्या अभिव्यक्तीमध्ये केंद्र करणाऱ्या कवितेला सामाजिक कविता म्हणता येईल. सामाजिक कविता म्हणजे समाजविषयक असलेली कविता होय. सामाजिक कवितेमध्ये समाजाची सुख-दुःखे, व्यथा-वेदना प्रश्न समस्या, -चळवळी-आंदोलने यांना महत्त्वाचे स्थान असते. ह्या सर्व गोष्टी सामाजिक कविते कधी वर्णनाच्या, कधी निवेदनाच्या, कधी चित्रणाच्या, तर कधी चिंतनाच्या पातळीवरून व्यक्त होत असतात. त्या व्यक्त करणारा कवी हा कसा आहे, त्यावर ह्या सर्व टींचे स्वरूप, दर्जा, मूल्य, महत्त्व हे अवलंबून असते. ह्यातूनच कवी आणि समाज सामाजिक कवितेचे द्वंद्वात्मक स्वरूप आकारास येत असते. हे द्वंद्वात्मक स्वरूप कधी संघर्षात्मक, कधी समन्वयात्मक, तर कधी सुसंवादात्मक असते. सामाजिक जितके कविमनाला महत्त्व असते, तितकेच समाजमनालाही महत्त्व असते. कविमनाला जर समाजमन नीट कळले समजले, तर कवी आपल्या सामाजिक कवितेत ते यथार्थपणे शब्दबद्ध करू शकणार अन्यथा नाही. एखादा कवी जर सामाजिक कार्यकर्ता असेल, तर त्याला समाजमन जाणून घेण्यास अजून काही वेगळे प्रयत्न करावे लागणार नाहीत.
प्रश्न:
(v)सामाजिक कवितेतील कविमन व समाजमन यांच्यामधील संबंध कसा असतो ?
Answers
Answered by
0
Answer:
द्वंद्वात्मक संघर्षात्यक समन्वयात्मक सुसंवादात्मक स्वरुपाचा संबंध असतो
Similar questions