Hindi, asked by bhaveshvarak13, 6 hours ago

खालील उतारा वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे लिहा : 'सामाजिक कविता' हा अनेक कविताप्रकारांपैकी एक कविताप्रकार आहे. कवितेतील विषय आणि आशय लक्षात घेऊन तो मानला जातो. अर्थात अभ्यासाच्या सोयीमधूनच हा आणि अशा प्रकारचे इतर कविताप्रकारही कल्पिले गेले आहेत. सामाजिक कविता म्हणजे केंद्रस्थानी समाजजाणीव असलेली कविता होय. कोणत्याही एका समूहजाणीवेला, समूहाच्या व्यथेला, दुःखाला आपल्या अभिव्यक्तीमध्ये केंद्र करणाऱ्या कवितेला सामाजिक कविता म्हणता येईल. सामाजिक कविता म्हणजे समाजविषयक असलेली कविता होय. सामाजिक कवितेमध्ये समाजाची सुख-दुःखे, व्यथा-वेदना प्रश्न समस्या, चळवळी-आंदोलने यांना महत्त्वाचे स्थान असते. ह्या सर्व गोष्टी सामाजिक कविते कधी वर्णनाच्या, कधी निवेदनाच्या, कधी चित्रणाच्या, तर कधी चिंतनाच्या पातळीवरून व्यक्त होत असतात. त्या व्यक्त करणारा कवी हा कसा आहे, त्यावर ह्या सर्व टींचे स्वरूप, दर्जा, मूल्य, महत्त्व हे अवलंबून असते. ह्यातूनच कवी आणि समाज सामाजिक कवितेचे द्वंद्वात्मक स्वरूप आकारास येत असते. हे द्वंद्वात्मक स्वरूप कधी संघर्षात्मक, कधी समन्वयात्मक, तर कधी सुसंवादात्मक असते. सामाजिक जितके कविमनाला महत्त्व असते, तितकेच समाजमनालाही महत्त्व असते. कविमनाला जर समाजमन नीट कळले समजले, तर कवी आपल्या सामाजिक कवितेत ते यथार्थपणे शब्दबद्ध करू शकणार अन्यथा नाही. एखादा कवी जर सामाजिक कार्यकर्ता असेल, तर त्याला समाजमन जाणून घेण्यास अजून काही वेगळेप्रयत्न करावे लागणार नाहीत प्रश्नः- (v)सामाजिक कवितेतील कविमन व समाजमन यांच्यामधील संबंध कसा असतो ?​

Answers

Answered by sgingle933
0

Answer:

सामाजिक कवितेतील कवी मन व समाजमन यांच्यामधील संबंध हा द्वंद्वात्मक स्वरूपाचा तर कधी संघर्षात्मक , कधी समन्वयात्मक , तर कधी सुसंवादत्मक, स्वरूपाचा संबंध असतो

Explanation:

सामाजिक कवितेमध्ये समाज जीवनाच्या अभिव्यक्ती आढळून येतात . त्यामध्ये समाजामधे होणारे बदल उत्सव क्रांती अशांती या सर्वाचे प्रतिबिंब आढळून येते . म्हणजेच सामाजिक कवितेचे स्वरूप मुळात द्वंद्वात्मक स्वरूपाचे असते. मग तो सामाजिक अनिष्ठ प्रथेविरुद्ध प्रखर टिका असेल तर कवितेचे स्वरूप संघर्षात्मक असेल . आणि सामाजिक सलोखा सौहार्द कविता वर्णन करत असेल तर तेव्हा समन्वयालक असते. जेव्हा समजामध्ये बदल घडवून सामाजिक क्रांती घडवायची असेल किंवा वंचित शोषितांचा आवाज बनलेली कविता त्या लढण्यास प्रवृत्त करत असेल तर तेव्हा ती सुसंवादात्मक स्वरूप ची असने

अश्याप्रकारे सामाजिक कवितेचे स्वरूप द्वंद्वात्मक संघर्षात्मक संवादात्मक स्वरूपाचे असते.

Similar questions