खालील उतारा वाचा व त्याचा १/३ सारांश तुमच्या शब्दात लिहा. ज्या जगात मी आलो, ते जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करून जाईल अशी जिद हवी केवल
विद्यार्थ्यांबद्दल नव्हे, तर आपल्या सर्वच समाजाबदल माझी ही तक्रार आहे. की आपण | जीवनाकडे पाहतच नाही. तरुण असंतुष्ट म्हणून ओरड होते. मी म्हणालो, तरूण असंतुष्ट नाहीत तो देश काय आहे? तरूणांनी असंतुष्ट राहिले पाहिजे; पण ते या अर्थान, की त्यांनी जीवनाचे आव्हान स्वीकारावे. "प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात | खोदा," असे केशवसुतांनी सांगितले आहे. त्यातील 'लेणी' हा शब्द फार सुंदर आहे. त्यांनी 'चित्रे रंगवा' असे म्हटले नाही, तर कलानिर्मिती ही पाहून अवघड कामगिरी आहे. ही निर्मिती सहजासहजी होत नाही, त्यासाठी पत्थर फोडून त्यांच्याशी झुंज द्यावी लागते. हे आव्हान तुम्ही स्वीकारा, तशी जिद्द बाळगा, एवढेच माझे आजच्या तरुण पिढीला सांगणे आहे.
Answers
प्रश्न :-
खालील उतारा वाचा व त्याचा १/३ सारांश तुमच्या शब्दात लिहा.
ज्या जगात मी आलो, ते जग मृत्यूपूर्वी मी सुंदर करून जाईल अशी जिद हवी केवलविद्यार्थ्यांबद्दल नव्हे, तर आपल्या सर्वच समाजाबदल माझी ही तक्रार आहे. की आपण | जीवनाकडे पाहतच नाही. तरुण असंतुष्ट म्हणून ओरड होते. मी म्हणालो, तरूण असंतुष्ट नाहीत तो देश काय आहे? तरूणांनी असंतुष्ट राहिले पाहिजे; पण ते या अर्थान, की त्यांनी जीवनाचे आव्हान स्वीकारावे. "प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात | खोदा," असे केशवसुतांनी सांगितले आहे. त्यातील 'लेणी' हा शब्द फार सुंदर आहे. त्यांनी 'चित्रे रंगवा' असे म्हटले नाही, तर कलानिर्मिती ही पाहून अवघड कामगिरी आहे. ही निर्मिती सहजासहजी होत नाही, त्यासाठी पत्थर फोडून त्यांच्याशी झुंज द्यावी लागते. हे आव्हान तुम्ही स्वीकारा, तशी जिद्द बाळगा, एवढेच माझे आजच्या तरुण पिढीला सांगणे आहे.
उत्तर :-
विद्यार्थी अथवा तरूण पिढीत असो आपण मृत्यू पुर्वी जगाला सुंदर करून जाण्याची जिद्द असायला हवी. तरूणांनी असंतुष्ट राहिले पाहिजे; पण ते या अर्थान, की त्यांनी जीवनाचे आव्हान स्वीकारावे. केशवसुतांनी 'चित्रे रंगवा' असे म्हटले नाही, तर कलानिर्मिती ही पाहून अवघड कामगिरी आहे. ही निर्मिती सहजासहजी होत नाही, त्यासाठी पत्थर फोडून त्यांच्याशी झुंज द्यावी लागते. तरूण पिढीनी हे आव्हान स्वीकारले पाहिजे.
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬