India Languages, asked by vilorina4652, 1 year ago

(६) खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
(अ) डोळे विस्फारून बघणे-(आ) लळा लागणे-
(इ) तुटून पडणे-(ई) तावडीत सापडणे-

Answers

Answered by Anonymous
49
डोळे विस्फरून बघणे- रागाने बघणे 
वाक्य - मी  आईला  उत्तर दिल्यावर आईने डोळे विस्फरून बघितले . 

लळा लागणे - आपुलकी निर्माण होणे -  कोणत्याही आईला आपल्या बाळाचा लगेच  लळा   लागतो.

तुटून  पडणे - हल्ला करणे - भारतीय  सैनिक शत्रू वर तुटून पडतात  म्हणून आपण  सुखी  राहतो . 

तावडीत सापडणे - दंगा  विद्यार्धी शिक्षकांच्या तावडीत   सापडली .

Anonymous: तावडीत सापडणे - कबजात सापडणे -दंगा घालताना मुले तावडीत सापडली .
Anonymous: plz mark as brainliest...
Answered by halamadrid
39

■■ प्रश्नात दिलेले वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ व वाक्यात प्रयोग:■■

१. डोळे विस्फारून बघणे - आश्चर्याने पाहणे.

वाक्य: आम्ही जादूगराचे खेळ डोळे विस्फारून बघत होतो.

२. लळा लागणे - माया किंवा प्रेम निर्माण होणे.

वाक्य - शेजारी राहत असलेल्या आजीबाई छोट्या राहुलचे खूप लाड करायच्या, म्हणून राहुलला त्यांचा लळा लागला होता.

३. तुटून पडणे - हल्ला करणे.

वाक्य : भारताचे सैनिक हॉटेलमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर तुटून पडले.

४. तावडीत सापडणे - जाळ्यात किंवा कचाट्यात सापडणे.

वाक्य : रीमा शाळेतून घरी येत असताना अपहरणकर्त्यांच्या तावडीत सापडली.

Similar questions