खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तोंडाला पाणी सुटणे
पारा उतरणे
डोळे उघडणे
मारामार पडणे
पित्त खवळणे
रडकुंडिला येणे
हातभार लावणे
मग्न होणे
गांगरून जाणे
देहभान हरपणे
गळ्यातला ताईत बनणे
गतप्राण होणे
गाठ पडणे
अंगावर काटा उभा रहाणे
कायापालट होणे
खालील म्हणी पूर्ण करा.
वासरात लंगडी _____________________.
अडला हरी _____________________.
अंथरूण पाहून _____________________.
मुलाचे पाय _____________________.
अतिशहाणा _____________________.
_____________________ खळखळाट फार.
_____________________ करावे मनाचे.
_____________________ मागचा शहाणा.
_____________________ अंगण वाकडे.
_____________________ भाराभर चिंध्या.
_____________________ गावाला वळसा.
_____________________ नाचतील भुते.
_____________________ लक्षण खोटे.
_____________________ पाणी चाखी.
_____________________ नागोबा.
खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
सत्य
खरे
नवे
जय
हुशार
उदय
नफा
जन्म
सुख
सुंदर
देव
हजर
पाप
जहाल
आदर
Answers
Answer:
तोंडाला पाणी सुटणे या या वाक्यप्रचाराचा वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा वाक्यात उपयोग करा
Answer:
खाण्याची हाव निर्माण होणे म्हणजे तोंडाला पाणी सुटणे
वाक्यात उपयोग
- बासुंदी बघता बघताच अजयच्या तोंडाला पाणी सुटले.
राग शांत होणे म्हणजे पारा उतरणे.
- साहेबांचे काम संध्याकाळपर्यंत कम्प्लीट करून दिल्यानंतर साहेबाचा पारा खाली उतरला.
अनुभवाने सावध होणे म्हणजे डोळे उघडणे.
- आपला मुलगा प्रत्यक्ष चोरी करतांना पोलिसांना सापडल्यानंतर अजयच्या आईचे डोळे उघडले.
अनेक लोकांनी मिळून मारणे म्हणजे मारामार पडणे.
- चोरी करताना चोर सापडल्यावर त्याच्यावर मारामार पडली
खूप राग येणे म्हणजे पित्त खवळणे.
- आपण सांगितलेले काम न ऐकल्यामुळे अजयच्या वडीलांचे पित्त खवळले.
डोळ्यात अश्रू येणे म्हणजे रडकुंडीला येणे.
- अपघातानंतर मुलाची परिस्थिती पाहून आई रडकुंडीला आली
मदत करणे म्हणजे हातभार लावणे.
- छोटा अजय आपल्या आईच्या कामात नेहमी हातभार लावतो.
एकाग्र होणे म्हणजे मग्न होणे.
- परीक्षा जवळ आल्यावर विद्यार्थी अभ्यासात मग्न होतात
गोंधळून जाणे म्हणजे गांगरून जाणे.
- अचानक साहेब समोर आल्याने मनीष गांगरून गेला.
एखाद्या गोष्टीत हरवून जाणे म्हणजे देहभान हरपणे.
- परमेश्वराची पूजा करत असताना संत तुकाराम देहभान हरपत होते.
अत्यंत आवडता होणे म्हणजे गळ्यातला ताईत बनणे.
- खूप मेहनत केल्यामुळे विजय साहेबाच्या गळ्यातील ताईत झाला.
जीव सोडणे म्हणजे गतप्राण होणे .
- शिवाजी महाराजांसाठी अनेक मावळे गतप्राण झाले.
भेट होणे म्हणजे गाठ पडणे .
- आपल्या दुष्मनाची नेहमी आपली गाठ पडते.
मंत्रमुग्ध होणे म्हणजे अंगावर काटा येणे .
आपला मुलगा राज्यात पहिला आल्याचे ऐकताच नितेश च्या आईच्या अंगावर काटा आला .
परिस्थिती बदलणे म्हणजे कायापालट होणे .
- गरिबीतून शिकवून सुरेश अभियंता झाला व त्याच्या परिस्थितीचा कायापालट झाला.
म्हणी -
- गाय शहाणी
- गाढवाचे पाय धरी
- पाय पसरावे
- पाळण्यात दिसतात
- त्याचा बैल रिकामा
- उथळ पाण्याला
- ऐकावे जनाचे
- पुढच्यास ठेस
- नाचता येईना
- एक ना धड
- काखेत कळसा
- असतील गीते
- नाव मोठे
- आयत्या बिळात
विरुद्धार्थी शब्द-
- असत्य
- खोटे
- जुने
- पराजय
- मठ्ठ
- अस्त
- तोटा
- मरण
- दुःख
- कुरूप
- दानव
- गैरहजर
- पुण्य
- मवाळ
- अनादर