(४) खालील वाक्प्रचारांचे अर्थलिहून तक्ता पूर्ण करा
Answers
(४) खालील वाक्प्रचारांचे अर्थलिहून तक्ता पूर्ण करा.
खालील वाक्यप्रचार हे इयत्ता दहावीच्या कुमारभारती या पुस्तकातील " काळे केस " या पाठातील असून याचे लेखक ना.सी.फडके हे आहेत. काळे केस हा पाठ लेख फडके यांच्या गाजलेल्या लघुनिबंध पैकी एक आहे.या लघुनिबांधात लेखकांनी पांढरे होत जाणारे केस काळे करण्यामागे असलेल्या लोकांच्या वृत्तीचा त्यांनी आपल्या विशेष शैलीत करून दिला आहे तसेच विचार करणे या माणसाच्या प्रवृत्तीचे वैशिष्ट्य दाखवून दिले आहे. खालील वाक्यातील वाक्प्रचारांचा अर्थ खालील प्रमाणे सांगता येईल.
वाक्प्रचार व त्यांचा अर्थ
(अ ) गुडघे टेकणे
उत्तर:- शरण जाणे.
गुडघे टेकणे म्हणजे सर्व पर्याय संपल्यावर काहीही हातात नसतांना शरण जाणे होय.
(आ) खनपटीला बसणे
उत्तर:- खूप आग्रह धरणे.
खनपटीला बसणे म्हणजे एखादे काम पूर्ण करण्यासाठी लहान मुले खूप आग्रह करतात , जसे कि नवीन खेळणी घेऊन मागतांना.
(इ) तगादा लावणे
उत्तर:- पुन्हा पुन्हा सतत आग्रह धरत राहणे.
तगादा लावणे म्हणजे एकाच गोष्टीसाठी पुन्हा पुन्हा सतत आग्रह धरणे होय.
(ई) निकाल लावणे
उत्तर:- निर्णयापर्यंत नेणे.
निकाल लावणे म्हणजे खोटया गोष्टीचे खरे रूप काय आहे ह्याचा निर्णय देणे.
(उ) पिच्छा पुरविणे
उत्तर:- खूप आग्रह धरणे./शेवटास नेणे
पिच्छा पुरविणे म्हणजे खूप आग्रह धरणे होय.
वरीलप्रकारे वाक्प्रचारांचा अर्थ स्पष्ट करता येईल.
Answer:
"नमस्कार मित्रा,
सदर प्रश्न कुमारभारती (१० वी) च्या पुस्तकातील ""काळे केस"" या पाठातील आहे. प्रस्तुत पाठात लेखक ना. सी. फडके यांनी पांढरे होत जाणारे केस काळे करण्यामागे असलेल्या लोकांच्या वृत्तीचा त्यांनी खुमासदार शैलीत परिचय करून दिला आहे आणि 'विचार करणे' या माणसाच्या मूलभूत प्रवृत्तीचे वैशिष्ट्य दाखवून दिले आहे.
◆ वाक्प्रचाराचे अर्थ.
(अ) गुडघे टेकणे
अर्थ- शरण जाणे.
(आ) खनपटीला बसणे
अर्थ- शेवटास नेणे.
(इ) तगादा लावणे
अर्थ- सतत आग्रह धरत राहणे.
(ई) निकाल लावणे
अर्थ- निर्णयापर्यंत येणे.
(उ) पिच्छा पुरवणे
अर्थ- खूप आग्रह करणे.
धन्यवाद...
"
Explanation: