खालील वाक्यांचा अलंकार प्रकार ओळखा.
1)हा आंबा साखरेसारखा गोड आहे
2)आभाळ सांडताना आले अरुण झाले.
पाण्यात चांदणेही थोडे करुण झाले.
Answers
Answer:
- उपमा अलंकार (अर्थालंकार)
- यमक अलंकार
Answer:
१. हा आंबा साखरेसारखा गोड आहे.
वरील वाक्यात उपमा हा अलंकार आहे. कारण आंबा आणि साखर यांच्यातील गोड पणाची तुलना केली आहे.
२. आभाळ सांडताना आले अरुण झाले,
पाण्यात चांदणेही थोडे करूण झाले.
वरील वाक्यात यमक अलंकार आहे.
Explanation:
अलंकार-
ज्याप्रमाणे शरीराचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळे अलंकार असतात, त्याचप्रमाणे भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी अलंकारांचा वापर केला जातो.
उपमा - उपमेय व उपमान यांच्यातील समानता किंवा समान गुणधर्म दाखवलेले असतात त्या वेळेस त्या वाक्यात उपमा अलंकार असतो.
उदारणार्थ -
हा आंबा साखरेसारखा गोड आहे.
या वाक्यात आंबा आणि साखरेचा गोडवा यांच्यातील गुणधर्म समान आहे म्हणून या वाक्यात उपमा हा अलंकार आहे.
यमक अलंकार:
एखाद्या काव्यातील भाषासौंदर्य वाढवण्यासाठी व बोलण्यातील ओघ येण्यासाठी काव्यपंक्तीच्या शेवटी एखादा शब्द किंवा अक्षराचा पुनरुच्चार केला जातो त्याला यमक अलंकार म्हणतात. उदारणार्थ-
आभाळ सांडताना आले अरुण झाले,
पाण्यात चांदणेही थोडे करूण झाले.
वरील ओळींच्या शेवटी 'ण' या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे म्हणून वरील ओळींमध्ये यमक अलंकार आहे.