३) खालील वाक्यांचे प्रकार ओळखा
मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो.
Answers
Answer:
प्रत्येक वाक्य शब्दाचे बनलेले असते. वाक्य म्हणजे अर्थपूर्ण शब्दाचा समूह होय. वाक्यात केवळ शब्दाची रचना करून चालत नाहीत तर, ती अर्थपूर्ण शब्दाची रचना असावयास पाहिजे तेव्हाच ते वाक्य होऊ शकते. वाक्याचा अर्थ स्पष्ट कळण्याकरीता वाक्यात आलेल्या प्रत्येक शब्दाचा (पदाचा) परस्परांशी संबंध काय हे कळणे महत्वाचे असते. प्रत्येक वाक्यात कर्ता व क्रियापद हे महत्वपूर्ण भाग मानले जातात. जर क्रियापद सकर्मक असेल तर त्या वाक्यातील कर्म हे तिसरा महत्वाचा भाग मानला जातो. या तीन शब्दाबरोबर वाक्यामध्ये विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यये, उभयान्वयी अव्यये, केवलप्रयोगी अव्यये आणि विधानपूरक इत्यादी शब्द येतात. वाक्यात येणारा प्रत्येक शब्दाचा परस्परांशी काहीतरी संबंध जोडलेला असतो. वाक्यातील या शब्दाच्या संबंधातून आपल्याला वाक्याचा पूर्ण अर्थ कळतो.
वाक्याची रचना –
वाक्यात येणारे शब्द कोणत्या क्रमाने यावेत याबाबत असा कोणताही नियम नाही; तथापि वाक्यातील शब्द विभक्तीच्या अनुक्रमाने यावेत व एखाद्या शब्दाशी निकट संबंध दर्शविणारे शब्द त्या शब्दाजवळच असावेत असा संकेत मात्र निश्चितच आहे. वाक्यातील शब्दांची रचना ही नियमांना धरून आहे.
कर्ता हा त्याच्या विशेषणासह वाक्यात सुरूवातीला आला पाहिजे.
क्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्याच्या शेवटी आले पाहिजे.
कर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्याच्या मध्यभागी येते.
वाक्यात उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुसंगाने मध्यभागी आले पाहिजे.
जर वाक्यात केवलप्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या सुरूवातीला आले पाहिजे. अशा प्रकारे वाक्याची रचना केली जाते.
Explanation:
hope it helps
make it brainlist
follow me
thank you