खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.
(१) “राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना?"
(२) “तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी.
(३) “तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये."
(४) “म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार!"
Answers
Answer:
(१) “राजा, तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना?"
→ प्रश्नार्थी वाक्य
ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
(२) “तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी.
→ विधार्थी वाक्य
जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.
(३) “तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये."
→ आज्ञार्थी वाक्य
ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
(४) “म्हणजे मला पुन्हा दहा रुपये दंड बसणार!"
→उद्गारार्थी वाक्य
ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.
- अर्थावरून पडणारे प्रकार
- स्वरूपावरुण पडणारे प्रकार
Answer:
विधानार्थी वाक्य.......