खालील वाक्यांचे रूपांतर करा .
१. दररोज अभ्यास करावा . (आज्ञार्थी करा) २. मला हे चित्र नापसंत नाही . (होकारार्थी करा)
३. बाबा पुण्यात राहतात . (प्रश्नार्थी करा) ४. तू रोज व्यायाम करतो का (विधानार्थी करा)
५. अरेरे काय झाले (उदगारार्थी करा) ६. मी सहलीला जाईल. (नकारार्थी
you give ans I mark you brilliant
Answers
Answer:
1) दररोज अभ्यास करा.
2) मला हे चित्र पसंत आहे.
3) बाबा पुण्यात राहतात?
4) तू रोज व्यायाम करतो.
5) अरेरे! काय झाले!
6) मी सहलीला जाणार नाही.
१.दररोज अभ्यास करा.
२.मला हे चित्र पसंत आहे.
३.बाबा पुण्यात राहतात का?
४. तू रोज व्यायाम करतो.
५.अरेरे! काय झाले.
६.मी सहलीला जाणार नाही.
Explanation:
वाक्याचे कोण कोणते प्रकार असतात?
विधानार्थी वाक्य -
जे वाक्य फक्त साध्या पद्धतीने बोलले जाते किंवा ते फक्त केवल वाक्य असते अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात .
उदाहरणार्थ -
- चेतन चर्चगेटला फिरायला जातो.
- मानवी दररोज अभ्यास करते.
- दीपा सर्वांची काळजी घेते.
प्रश्नार्थी वाक्य-
ज्या वाक्याच्या माध्यमातून आपण एखादा प्रश्न निर्माण करतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ
- राहुल कोणत्या शाळेत जातो?
- तुझे नाव काय आहे?
- तुझे बाबा काय करतात?
आज्ञार्थी वाक्य -
ज्या वाक्यातून एखाद्याला आज्ञा दिले जाते किंवा विनंती केली जाते अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ -
- दररोज अभ्यास करा.
- स्वच्छ कपडे घाला.
- नियमित व्यायाम करा.
उद्गारार्थी वाक्य -
ज्या वेळेस एखाद्या वाक्यातून अचानक आपल्या भावना व्यक्त केल्या जातात त्यावेळेस त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.
उदाहरणार्थ -
- अरेरे!त्याचा पेन हरवला.
- बापरे! किती मोठा साप.
वाक्यांच्या प्रकाराबद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/23947826
https://brainly.in/question/15738167
#SPJ3