India Languages, asked by jayabhayeaarya, 6 hours ago

खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व ती कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
1) देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?​

Answers

Answered by chandarai995884670
0

Answer:

जरा त्राग्यानेच विचारतो, की देशाला देण्यासाठी तुमच्याजवळ १० मिनिटे वेळ आहे का? असेल तर ऐका. तुम्ही म्हणता, आपले शासन कुचकामाचे तुम्ही. तुम्ही म्हणता, आपले कायदे फार जुनाट झाले आहेत. तुम्ही म्हणता, नगरपालिका कच-याचे ढीग उचलत नाही. तुम्ही म्हणता, फोन्स चालत नाहीत. रेल्वेसेवा विनोदी आहे. विमान वाहतूक जगातील एक रद्दड वाहतूक आहे आणि पत्रे वेळेवर व पत्त्यांवर पोहचत नाहीत. तुम्ही म्हणता, देशाचा सत्यानाश केला आहे. तुम्ही हे सारखे बोलत असता; पण हे होऊ नये म्हणून तुम्ही स्वत: काय करता?

भूतपूर्व आयुक्त तिनईकर एकदा म्हणाले होते, 'श्रीमंत माणसांची कुत्री रस्त्यावर चालतात आणि घाण रस्त्यावर हेच लोक पुढे म.न.पा. चे रस्ते व फुटपाथ स्वच्छ नसल्याची तक्रार करतात. अमेरिकेत कुत्र्याने रस्त्यावर केलेली घाण कुत्र्याच्या मालकाला काढावी लागते. जपानमध्ये असेच आहे. भारतीय नागरिक तसे इथे करतील?'

आपला हातभार शून्य असताना शासनाने सर्वकाही केले पाहिजे, असे आपण गृहीत धरून चालतो. शासनाने सर्वत्र स्वच्छता करावी असे गृहीत धरतो; परंतु स्वत: सर्वत्र उकिरडा करावयाचे आपण सोडत नाही. आपण कधी मध्येच थांबून रस्त्यावरील कागदाचा कपटा उचलून कच-याच्या पेटीत टाकणार आहोत का? आपली अपेक्षा असते, की रेल्वेने स्वच्छ प्रसाधने पुरवावीत; परंतु प्रसाधने स्वच्छ कशी ठेवावीत हे आपण कधी शिकणार?

शेवटी मी एवढेच म्हणेन, की देशासाठी आपण काय करणार आहोत हे स्वत:ला विचारा आणि चांगला भारत घडवण्यासाठी जे करायला हवे ते करा.

Explanation:

please mark as brainliest

Answered by Anonymous
1

Answer:

ह्या वाक्यात तुमच्याकडे हा शब्दयोगी अव्यय आहे.

हा शब्द 'तुमच्या' या शब्दाला जोडलं आहे.

Similar questions