Hindi, asked by bharatbhingole855, 7 months ago

खालील वाक्यांतील विशेषणे ओळखा.
(i) नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो.
(ii) धाकटया भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले
(iii) आईने कोरडे धोतर दिले.​

Answers

Answered by mad210216
0

वाक्यांतील विशेषणे आहेत:

१.नवीन २. धाकट्या, लहानसे ३.कोरडे

Explanation:

(i) नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो.

या वाक्यात 'नवीन' हा शब्द 'कोट' या नामाबद्दल अधिक माहिती देतो, म्हणून तो विशेषण आहे.

(ii) धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले

या वाक्यात 'धाकट्या' हा शब्द 'भावाने' या नामाबद्दल व  'लहानसे' हा शब्द 'गाठोडे' या नामाबद्दल अधिक माहिती देतात, म्हणून ते विशेषणे आहे.

(iii) आईने कोरडे धोतर दिले.

या वाक्यात 'कोरडे' हा शब्द 'धोतर' या नामाबद्दल अधिक माहिती देतो, म्हणून तो विशेषण आहे.

  • विशेषण म्हणजे तो शब्द जो नामाबद्दल आपल्याला अधिक माहिती देतो.
  • विशेषणाचे तीन मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
  • गुणवाचक विशेषण : असे विशेषण जे आपल्याला नामाच्या विषेश गुणाबद्दल माहिती देते.
  • उदाहरण: सुंदर, हुशार.
  • संख्या विशेषण: असे विशेषण जे नामाच्या संख्येबद्दल माहिती देते.
  • उदाहरण: प्रथम, हजारो
  • सार्वनामिक विशेषण : सर्वनामापासून बनलेले विशेषण, जे नामाबद्दल विशेष माहिती देते.
  • उदाहरण: माझे शहर.

Similar questions