खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा १) हिरमोड होणे २) कानोसा घेणे ३) फरफट होणे ४) वेध लागणे ५) अंगावर काटा येणे ६) घाव सोसणे ७) सज्ज असणे ८) सामना करणे ९) हैरान होणे १०) घाव सोसणे
Answers
Answer:
१. हिरमोड होणे-
अर्थ- निराश होणे.
वाक्यात उपयोग-
परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे रामाचा हिरमोड झाला.
२. कानोसा घेणे.
अर्थ- अंदाज घेणे.
वाक्यात उपयोग-
चोर चोरी करत असताना घरात तर कोणी नाहीना याचा कानोसा घेत होते.
३. फरफट होणे.
अर्थ -हाल होणे.
वाक्यात उपयोग- महिन्याचा खर्च पूर्ण करताना रामाची फरफट होत होती.
४. वेध लागणे.
अर्थ- ओढ लागणे.
वाक्यात उपयोग- परीक्षा झाल्यानंतर राहुल ला निकालाचे वेध लागले.
५. अंगावर काटा येणे.
अर्थ -रोमांचित होणे.
वाक्यात उपयोग- बाबांनी सांगितलेली गोष्ट ऐकून अंगावर काटा आला.
६. घाव सोसणे.
अर्थ -यातना होणे.
वाक्यात उपयोग -मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी राजारामने खूप घाव सोसले.
७. सज्ज असणे.
अर्थ -तयार असणे.
वाक्यात उपयोग- येणाऱ्या कुठल्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी दिनेश सज्ज असतो.
८. सामना करणे.
अर्थ -सामोरे जाणे, तोंड देणे.
वाक्यात उपयोग- मुलांना मोठे करण्यासाठी आई-वडील कुठल्याही गोष्टीचा सामना करण्यास तयार असतात.
९. हैरान होणे.
अर्थ- त्रासून जाणे.
वाक्यात उपयोग- दिलेले ध्येय पूर्ण करता करता राजेश हैराण झाला.