खालील विषयांवर अहवालाचे लेखन करा.
(अ) तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन.
Answers
Answer:
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयांमधील मौजमस्ती सर्वांना खूप आवडते आज आपण महाविद्यालयातील स्नेहसंमेलन मराठी निबंध | Mahavidyalayatil Sneh Sammelan Marathi Nibandh बघणार आहोत. निश्चितच तुमच्या महाविद्यालयांमध्ये तुम्ही आनंदाने आणि धडाक्यात बिनधास्त होऊन मनमुरादपणे मित्रांच्या सानिध्यात शिक्षक प्राध्यापकांच्या सहकार्याने आपल्या कलागुणांच्या बळावर मनाच्या आत जडलेल्या प्रतिभेला एक नवे वळण देऊन नवीन काहीतरी निश्चित केले जातील त्यामुळे तुमची खुप स्तुतिसुमने सुद्धा झाली असतील चला तर मग अशाच या शीर्षकांतर्गत आज आपण निबंध लेखन करणार आहोत तुमच्या आमच्या सर्वांचा आवडीचा स्नेहसंमेलन या विषयावर चला सर्व प्रत्यक्षरीत्या निबंधाला सुरुवात करुया.
Explanation:
your answer
रंगलाल केजदिवाल कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविदयालय
नागपूर
शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता महाविदयालयाच्या भव्य प्रांगणात सन २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन विदयार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले. समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गणेश दिघे यांनी भूषवले होते. सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयाचे सर्व अध्यापक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा आरंभ ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविदयालयाच्या बारावी विज्ञान शाखेतील मोहिनी काळे या विदयार्थिनीच्या सुमधुर गीताने सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा. कुमार दाढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. प्रा. दीप्ती राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले. सर्वांच्या सत्कारानंतर कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महेश देशपांडे यांनी सन २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविदयालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडाविषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व अध्यापकांच्या कामाचे आणि विदयार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. डबिंग क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या. संभाषण कौशल्यासोबत वाचनाचे महत्त्वही सांगितले. प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने आवाजातील वैविध्य विदयार्थ्यांना दाखवले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या यादीचे वाचन विदयार्थी प्रतिनिधी मंदार भावे आणि अश्विनी भोसले यांनी केले. प्रा. माणिक कढे यांनी सर्वांचे आभार मानले. तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
#SPJ3