India Languages, asked by ashishchhabadia394, 7 months ago

} खालील विषयावर सुमारे १५ ते २० ओळींचा निबंध लिहा.
१.} आपली समस्या प्रदूषण
२.} शेतक-याचे मनोगत
३.} आमची सहल​

Answers

Answered by puneetgoyal12
2

Answer:

please tell in English

Answered by sakshipal256
1

शेतक-याचे मनोगत

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या ब्लॉगवर आज आपण " शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध" या विषयावर लेखन करणार आहोत. मित्रांनो शेतकरी म्हणजेच आपला अन्नदाता, जगाचा पोशिंदा अशी अलंकारिक शब्द सामर्थ्याने लेखकांनी आणि कवींनी शेतकऱ्यांची स्तुती केली आहे. परंतु आजकाल परिस्थिती खूप बदलली आहे. मान्सूनचा लहरीपणा आणि इतर काही नैसर्गिक अनुकूलता यामुळे शेतकरी राजा फार चिंतेत असतो यावरच आज आपण निबंध बघणार आहोत.चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.

शेतकऱ्याचे आत्मवृत्त :-

मी एक कोरडवाहू शेतकरी आहे. पावसाच्या पाण्यावर माझी शेती अवलंबून असते. पावसाच्या पाण्याचा थेंबन् थेंब मी उपयोगात आणतो. माझे कुटुंब छोटे आहे मी, माझी पत्नी आणि दोन मुले. माझी दोन्ही मुले शाळेत जातात. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही खूप कष्ट करतो.

हा कधी पाऊस रुसतो, अजिबात पडत नाही. कधी खूप कोसळतो. कधी अवेळी पडतो. कधी केलेली पेरणी फुकट जाते. तर कधी तयार झालेले पीक पाण्यात वाहून जाते वा कुजते. या साऱ्या संकटांचा सामना करायला आम्ही आता शिकलो आहोत. पण जेव्हा पाऊस वेळेवर व हवा तेवढाच पडतो, तेव्हा आमचे शेत फुलून येते.पिकवलेले धान्य घरात आले की माझे मन तृप्त होते. हीच आम्हां शेतकऱ्यांची श्रीमंती. मी नेहमी आलटून-पालटून वेगवेगळी पिके घेतो, त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. शेताबरोबर मी छोटासा मळाही फुलवतो. मळ्यातील फळे, फुले विकून मला घरखर्चाला पैसा मिळतो. नेहमी पीक देणारी चिंच, नारळ अशी काही झाडेही मी लावली आहेत.

शेतात एखादे पीक खूप आले की पिकाचे भाव पडतात. शेतकऱ्याचे नुकसान होते. पिकावर रोग पडू नये याची खूप काळजी घ्यावी लागते. वेळेवर औषधे फवारावी लागतात. मला माझ्या काळ्या आईची सेवा करण्यात खरोखर धन्यता वाटते.

Similar questions