खालील विषयांवर वैचारिक निबंध लिहा
Answers
Answer:
झांडांचे महत्व
सगळीकडे ही एकच चर्चा सुरू आहे की, मे महिना संपून जून सुरू झाला, तरी पाऊस कुठे दडी मारून बसला आहे कोणास ठाऊक? उकाड्याने हैराण झालेले लोक चातक पक्षासारखी पावसाची उत्कटतेने वाट पाहत आहेत. दिवसेंदिवस निसर्गाचा लहरीपणा वाढण्याचे कारण मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड आहे. ज्या निसर्गाकडून, वृक्षांकडून मानवाने भरभरून घेतले आहे, घेत आहे, त्या माणसाचे निसर्गाबरोबरचे नाते अगदी प्राचीन आहे; कारण मानवाचा प्राचीन इतिहास आपणास हेरुा सांगतो की, वृक्षांच्या सोबतीनेरुा मानवाचा व त्याच्या संस्कृतिचा विकास झाला.वृक्षाचे मानवी जीवनातील स्थान निबंध / वृक्षांचे महत्व निबंध मराठी
आज दिवसेंदिवस लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहे. आपल्यासमोर जी इतर आव्हाने आहेत, त्यात लोकसंख्येचे वाढते प्रमाण व त्यावर आळा घालणे हे एक आवाहन आहे. या वाढणान्या लोकसंख्येमुळे लोकाना राहण्यासाठी जागेची कमतरता भासते. रहदारीची समस्या वाढते. मग यातून एक मार्ग शोधला जातो, तो म्हणजे वृक्षतोड. घरासाठी लाकूड हवे. रस्त्यांचे चौपदरीकरण करून वाहतूकीची कोंडी दूर करण्यासाठी आजूबाजूची, रस्त्यालगतची वर्षानुवषाह्लची झाडे आपण तोडून टाकतो. या सर्व कृतीतून आपण आपला विकास आणि प्रगती साधत असताना, नकळतपणे निसर्गाचा तोल बिघडवत आहोत, हेरुा विसरून जातो.मानवाला त्याच्या दैनंदिन जीवनात गरजेच्या सर्वरुा गोषी अगदी निरपेक्ष हेतूने वृक्ष देतात. मानवाची अन्नधान्याची गरज भागवण्यापासून ते घरसजावटीसाठी लागणार्या वस्तू ही वृक्षांचीच देण आहे. आयुर्वेदातील वनौषधींचा पुरवठा,सौंदर्यप्रसाधनाची उपलब्धता वृक्षांमुळे होते. दैनंदिन कामकाजातील थकवा, मनाचा शीण घालवण्यासाठी पर्यटन सहलींचे आयोजन केले जाते, तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यातील तो आनंद काही औरच असतो. हिरव्यागार घनदाट वृक्षांनी आच्छादलेली पर्वतरांग नेत्रसुखाचा अवर्णनीय आनंद देऊन जाते.वृक्षांच्या सहवासात बर्यारुा साहित्यिकांची प्रतिभा स्पुञ्ज्रण पावलेली आहे. बोधिवृक्षाखाली ज्ञान साधनेतून जीवनाचे तत्वज्ञान प्राप्त करणारे `गौतम बुद्ध', वनस्पतींना ह्रदय आहे सांगणारे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ `जगदीश बोस', देवनार वृक्षांच्या संगतीत राहून काव्य रचणारे महान कवी `शेले' अशी कितीतरी नावे सांगता येतात.वाढत्या औद्यौगिकरणामुळे निर्माण होणान्या प्रदूषणावर मात करण्यासही वृक्षांची मदत होते. झाडे श्वासाबरोबर कार्बनडायऑव़साईड घेतात आणि ऑवि़सजन सोडतात, यामुळे वातावरण शुद्ध राहण्यास मदत होते. तसेरुा रस्त्याच्या आजुबाजूस असणार्या वृक्षांमुळे थकल्या-भागल्या प्रावाशांना, जनावरांना वृक्षांच्या छायेत आराम मिळतो. पशु-पक्षांना निवारा मिळतो.