५. खालील विषयावर वृत्तांत लेखन करा. "शारदा महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिन साजरा."
Answers
Answer:
प्रजासत्ताक दिन वृतांत लेखन
रत्नागिरी, दि. २७ जानेवारी: रत्नागिरी मधील शारदा महाविद्यालय येथे विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. शामराव पाटील यांच्या हस्ते झेंडावंदनाचा मुख्य कार्यक्रम महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. महाविद्यालयाचे प्राचार्य शामरावजी पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीतानंतर शामारावजी पाटील यांनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व संचलन पथकांचे निरीक्षण केले. पथकात एन.सी.सी. , एम. सी.सी. , स्काउट गाईड इत्यादी. महाविद्यालयामध्ये असलेल्या विभागांचा समावेश होता. यानंतर सराव पथकांनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.
मानवंदनेच्या कार्यक्रमानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रात्याक्षिके सदर केली. या मध्ये विद्यार्थांनी सादर केलेल्या मल्लखांबावरील कसरतींनी उपस्थित साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी उप. प्राचार्य कौस्तुभ चव्हाण, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शहरातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर उपस्थित सर्वाना जिलेबी चा गोड खाऊ वाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.