Hindi, asked by suhani1109, 11 hours ago

खालीलपैकी एका विषयावर निबंध लिहा.

१) झाडे लावा पर्यावरण वाचवा.

२) माझा मित्र

३)माझा आवडता सण .​

Answers

Answered by sonunimbajiwakode
5

Answer:

माझ्या आवडता सण दिवाळी

आपल्या देशात वेळोवेळी अनेक सण साजरे केले करतात. मला या सर्व सणांमध्ये सर्वात जास्त दिवाळीचा सण खूप चांगला वाटतो.

दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला साजरा केला जातो . त्या दिवशी आकाशात चंद्र उगवत नाही, काळाकुट्ट अंधार असतो .लोक आपल्या घरात दिवे लावतात . आणि काळ्या रात्रीचा प्रकाशात बदल होतो.

दीपावलीचा हा पर्व धनतेरस पासून आरंभ होतो तर भाऊबीज पर्यंत पाच दिवस चालतो. लोक आपापल्या घरांना सजवतात . नवे कपडे खरेदी करतात. मित्रांना ,नातेवाईकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या जातात. मिठाई , दीपावलीचा फराळ पाठवला जातो . याप्रसंगी बाजारात रंगीबेरंगी लाईटींग लावली जातात. बाजाराची शोभा पाहायला मिळते. मुलांना खेळणे खरेदी करून देतात.

दिवाळीच्या सणाला फटाके ,मोठे बॉम्ब, घनचक्कर ,कोठी , फुलझडी , आतिशबाजी करुन आनंद साजरा करतात .

मी दिवाळीच्या दिवसांत मोठमोठ्या रांगोळ्या काढते .आईला दिवाळीचा फराळ करण्यात मदत करते . दिवाळीच्या फराळात लाडू ,चिवडा ,करंजी ,अनारसे ,चकली असे बरेच काही बनवले जातात . मला दिवाळीची तयारी करायला खुप आनंद मिळतो.

दिवाळीच्या पाच दिवसात पुजेची तयारी करण्यात आनंद मिळतो . दिवाळीच्या पाच दिवसात दिवे लावली जातात .सगळकडे दिव्यांच्या प्रकाशाचा झगमगाट असतो . प्रकाश अंधारावर विजय मिळवतो .

म्हटले जाते की ,लंकेचा राजा रावणाचा वध करून या दिवशी परमेश्वर श्रीराम अयोध्येला परत आले होते . म्हणून लोकांनी आपला आनंद दर्शविण्यासाठी अयोध्या नगरीला सजवले . दिवे लावून चारही दिशांना प्रकाशित केले.

दिवाळीच्या दिवसापासून व्यापारींचो नवीन वर्ष सुरू होते आणि रात्री लक्ष्मी गणेश पूजन करतात . व्यापारी या दिवशी वही पूजन करतात. नवे वही खाते सुरू करतात .नवी वही घेऊन त्यात हिशोब करण्यास सुरूवात करतात .

अंधारावर प्रकाशाचा विजय मिळविण्याचा पर्व आहे . वाईटचा चांगल्या गोष्टींवर विजय मिळवण्याचा पर्व आहे . म्हणून दीपावलीचा सण मला खूप आवडतो.

Similar questions