खालीलपैकी कोणकोणत्या देशांनी आझादहिंद सरकारला मान्यता दिली?
Answers
Answer:
देश ब्रिटीशांच्या गुलामीत असतांना आझाद हिंद सेनेने नेताजींच्या नेतृत्वात ‘चलो दिल्ली’ चा नारा दिला, त्यासाठी रक्ताचे पाणी केले, अथक परिश्रम केले पण समोर येणाऱ्या अडचणी न संपणाऱ्या होत्या अखेर महानायकाचा दिल्लीत प्रवेश झालाच नाही. हिंदुस्थानावर अनेक आक्रमणे झाली, अनेकांनी राज्य केले पण १५० वर्षाची ब्रिटीशांची गुलामगिरी भारतमातेसाठी अत्यंत वेदनादायी ठरली. ब्रिटीश अत्यंत धूर्त होते व त्यांनी खेळलेल्या अंतर्गत राजकारणाने हिंदुस्थानातील अनेक लोकांनी आपल्याच देशबांधवांचे नुकसान केले. ‘फोडा आणि राज्य करा’ या नीतीने काम करून इंग्रजांनी भारतविरोधी कारवाया करण्यात स्वार्थी लोकांची मदत घेतली. देशहित सोडून स्वहित साधणारे संधिसाधू ब्रिटीशांच्या भोवती पिंगा घालण्यात व्यस्त असतांना अनेक क्रांतिकारी फासावर लटकवले गेले, अनेकांना अत्यंत कठोर काळ्या पाण्याची शिक्षा झाली. अश्या कठीण प्रसंगी अनेक लोक सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणाऱ्या, क्रांतिकारी मंडळींवर अनेक आरोप करून त्यांना देशद्रोही ठरविण्याचा पूर्ण प्रयत्न करीत होते. ब्रिटिशांना हाती घेऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात तन मन धनाने सहभागी होऊन सर्वस्व अर्पण करणाऱ्यांचा वारंवार अपमान करणे हे सत्र स्वतंत्र भारतात देखील बराच काळापर्यंत सुरू होते.