Business Studies, asked by jainprem1409, 3 months ago

खालीलपैकी कोणते समन्वयाचे तत्व आहेत एकवाक्यता​

Answers

Answered by rautom546
0

Answer:

-संघटनेमध्ये उपयोगात येणाऱ्या साधनसामग्रीचे आणि व्यक्तींचे नियंत्रण करणारी व पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजिलेली सुविहित यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. उत्पादनघटकांना संघटित व दिग्दर्शित करून त्यांच्यापासून संपत्ती निर्माण करण्याचे काम व्यवस्थापनाचे असते. थिओ हेमन या प्रसिद्ध व्यवस्थापनतज्ज्ञाने प्रोफेशनल मॅनेजमेंट थिअरी अँड प्रॅक्टिस या ग्रंथात व्यवस्थापन या शब्दाचे तीन अर्थ सांगितले आहेत : कोणत्याही संघटनेत उच्च पदावर कार्य करणाऱ्या अधिकारीवर्गाला उद्देशून व्यवस्थापन ही संज्ञा वापरली जाते. दुसरा अर्थ म्हणजे व्यवस्थापन ही एक ज्ञानशाखा असून ते एक शास्त्रही आहे. या ज्ञानशाखेत व्यवस्थापनाचे सिद्धांत, कार्यपद्धती इत्यादींबाबत अभ्यास केला जातो. व्यवस्थापनाच्या तिसऱ्या अर्थानुसार व्यवस्थापन ही एक प्रक्रिया असून तीत व्यवसायाचे नियोजन, संघटन, निदेशन वा संचालन, अभिप्रेरणा, समन्वय व नियंत्रण इ. कार्यांचा समावेश होतो. व्यवस्थापन म्हणजे प्रामुख्याने निदेशन असे म्हणता येईल.

Similar questions