Social Sciences, asked by govindavhad35, 1 month ago

खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात कारण​

Answers

Answered by shahupayal102
0

सागरी प्रवाह म्हणजे निश्चित दिशेने होणारी सागरजलाची हालचाल. समुद्र व महासागरातील पाणी स्थिर नसून त्यात भरती-ओहोटी,सागरी लाटा व सागरी प्रवाह अशा तीन प्रकारच्या हालचाली होत असतात. असे सागरी प्रवाह टास्मानिया समुद्रात आढळतात.

खोल सागरी भागातील अभिसरण प्रामुख्याने तापमान व लवणता यांच्यातील फरकावर अवलंबून असते. ही परिस्थिती प्रामुख्याने थंड प्रदेशात आढळते. सागरी पाण्याच्या तापण्यातील असमानता ही विशेषतः खोल सागरी भागातील पाण्याच्या हालचालीचे प्रमुख कारण आहे.

वाऱ्याची सागरजलाशी होणारी घर्षणक्रिया, वेगवेगळ्या जलस्तरांधील घर्षणक्रिया, पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी कोरिऑलिस प्रेरणा (भूवलनोत्पन्न प्रेरणा), सागरजलाचे तापमान, लवणता व घनतेतील तफावत इ. वेगवेगळ्या नैसर्गिक प्रेरणांवर सागरी प्रवाहांची निर्मिती, त्यांची दिशा व आकार अवलंबून असतो.

Similar questions