खाली दिलेल्या भारतातील पंतप्रधानांचा कालखंडानुसार योग्य क्रम लावा. एच. डच. देवेगौडा, राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी
Answers
Answer:
अटलबिहारी वाजपेयी (जन्म: २५ डिसेंबर १९२४; मृत्यू : १६ ऑगस्ट २०१८) हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती.
Answer:
भारताचे पंतप्रधान हे भारतीय प्रजासत्ताक सरकारचे प्रमुख आहेत.
भारताच्या पंतप्रधानांची यादी खालीलप्रमाणे आहे :
पंतप्रधानांच्या नावाचा कालावधी
जवाहरलाल नेहरू 15-ऑगस्ट-1947 ते 27-मे-1964
गुलझारीलाल नंदा 27-मे-1964 ते 9 जून 1964
लाल बहादूर शास्त्री 09-जून-1964 ते 11-जाने-1966
गुलझारीलाल नंदा 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966
इंदिरा गांधी 24-जानेवारी-1966 ते 24-मार्च-1977
मोरारजी देसाई 24-मार्च-1977 ते 28-जुलै-1979
चरणसिंग 28-जुलै-1979 ते 14-जाने-1980
इंदिरा गांधी 14-जाने-1980 ते 31-ऑक्टोबर-1984
राजीव गांधी 31-ऑक्टोबर-1984 ते 02-डिसेंबर-1989
विश्वनाथ प्रतापसिंह 02-डिसेंबर-1989 ते 10-नोव्हेंबर-1990
चंद्रशेखर 10-नोव्हेंबर-1990 ते 21-जून-1991
पी.व्ही. नरसिंह राव 21-जून-1991 ते 16-मे-1996
अटलबिहारी वाजपेयी 16-मे-1996 ते 01-जून-1996
एच.डी. देवेगौडा 01-जून-1996 ते 21-एप्रिल-1997
अटलबिहारी वाजपेयी 19-मार्च-1998 ते 22-मे-2004
डॉ. मनमोहन सिंग 22-मे-2004 ते 26-मे-2014
नरेंद्र दामोदरदास मोदी 26-मे-2014 ते पदावर
दिलेल्या पंतप्रधानांचा योग्य कालक्रमानुसार क्रम आहे:
1. राजीव गांधी
2.पी.व्ही. नरसिंहराव,
3.अटलबिहारी वाजपेयी
4.एच.डी. देवेगौडा