Hindi, asked by uthakar9, 2 months ago

खाली दिलेल्या मुद्यावरून कथा तयार करा गरीब भाजीवाली मुलाला शिक्षण दिले — मुलाला आई ची लाज—आईपासून दूर —मुलगा गंभीर आजारी —आईने आपले मूत्रपिंड दिले—मुलाचे प्राण वाचवल​

Answers

Answered by mad210216
57

कथा लेखन

Explanation:

निर्मळ प्रेम

  • एका गावात एक गरीब स्त्री राहायची. पैसे कमवण्यासाठी ती भाज्या विकत असे. ती खूप मेहनत करून पैसे कमवत असे.
  • गरीबी असून सुद्धा तिने तिच्या मुलाला चांगले शिक्षण दिले, जेणेकरून मुलाला चांगली नोकरी मिळाली. पैसे कमवू लागल्यावर मुलाचा स्वभाव बदलला.
  • त्याला आईच्या भाज्या विकण्याच्या कामामुळे लाज वाटू लागली. तो तिच्यापासून दूर राहू लागला.
  • काही दिवसांनी त्याची तबीयत खूप बिघडली. डॉक्टर कडून कळले की त्याचे एक मूत्रपिंड खराब झाले आहे. मुलाची परिस्थिती कळल्यावर आई लगेच त्याच्याजवळ गेली.
  • जेव्हा तिला डॉक्टरकडून कळले की ती तिचे एक मूत्रपिंड देऊन तिच्या मुलाचे प्राण वाचवू शकते. तेव्हा, तिने काहीही विचार न करता आपल्या मुलाला आपले मूत्रपिंड दान केले व त्याला पुन्हा नवे आयुष्य जगण्याची संधी दिली.
  • तात्पर्य: आईसारखे प्रेम आणि माया जगात इतर कोणाकडून ही मिळू शकत नाही.
Answered by YashswiNavalkar
4

Answer:

Explanation:

hii

Similar questions