Hindi, asked by vivekmohite6542, 3 months ago

(१) खाली दिलेल्या प्रसंगाच्या आधारे गोष्टी लिहा. शीर्षक देऊन तात्पर्य लिहा.
(१) प्रसंग (१)- एक लोभी माणूस
प्रसंग (२)-देवाची भक्ती व देव प्रसन्न
प्रसंग (३)-देवाचे वरदान व अट
प्रसंग (४)- सोने देतो खाली सांडू नको
प्रसंग (५)-खाली पडले तर माती
प्रसंग (६)-झोळी भरणे, वजनाने फाटणे
प्रसंग (७)-सगळी माती होणे
प्रसंग (८)-वाईट वाटणे, धडा शिकणे,​

Answers

Answered by borhaderamchandra
4

Answer:

एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळेल ते खायचा. काही मिळाले नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता.

त्याला कोणीतरी सांगितले की 'तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल'. तो त्याप्रमाणे करतो. इंद्र प्रसन्न होतो.

इंद्र त्याला म्हणतो, की 'तू तुझी झोळी पुढे कर. मी त्यात पैसे टाकत जाईत. तू जेव्हा थांब म्हणशील, तेव्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठेव, जर तुझी झोळी फाटली व पैसे खाली पडले तर त्यांची माती होईल. ‍

तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढेच पैसे घेतो व त्याला थांब म्हणतो. तेवढ्या पैशांवर तो आनंदीत होतो. त्यानंतर तो गावात येतो. चांगले कपडे घेतो, घर बांधतो.

त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमंत झालास ? तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो. त्या माणसालाही पैशांची हाव सुटते. तो सुध्दा गावाबाहेर जातो. इंद्राला प्रसन्न करतो. इंद्र त्याच्या झोळीत पैसे टाकायला सुरवात करतो.

तो आणखी मागत राहतो. शेवटी पैशाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते. सर्व पैसे खाली पडतात व त्यांची माती होते. त्याचबरोबर इंद्रही नाहीसा होतो. त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.

उपदेश : कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.

Similar questions