Science, asked by rajkadam8308386756, 6 months ago

खाली दिलेल्या रासायनिक अभिक्रियेच्या शाब्दिक समिकरणावरुन रासायनिक रेणूसूत्रचा वापर करून संतुलित समिकरन लिहा​

Answers

Answered by binadevi1983bablu
2

Answer:

please Mark in Brainlist thanks please

Explanation:

आपले उद्दिष्ट्य

खालील अभिक्रिया करून त्यांचे भौतिक किंवा रासायनिक बदल अशात वर्गीकरण करणे:

हवेत मॅग्नीशियमचे प्रज्वलन

त्यांच्या जलयुक्त द्रावण रूपात सोडियम सल्फेट आणि बेरीयम क्लोराइड

जलयुक्त कॉपर सल्फेट द्रावणात लोखंडी खिळा.

झिंक आणि विरल सल्फ्युरिक आम्ल

कॉपर सल्फेट गरम करणे.

सिद्धांत

रासायनिक अभिक्रियेत एक पदार्थ आणि दुसरा पदार्थ यांची अभिक्रिया होते आणि नवीन पदार्थ निर्माण होतो. नवीन पदार्थाचे रासायनिक घटक हे अभिक्रियाकारकांपेक्षा वेगळे असतात. रासायनिक बदलामुळे, पदार्थाची रासायनिक गुणधर्मे पण बदलतात. म्हणजे निर्माण झालेला पदार्थ हा कुठल्याही एका अभिकारकापेक्षा संपूर्णपणे वेगळा असतो. काही रासायनिक अभिक्रिया उष्माग्राही असतात आणि काही उष्मादायी.

उष्माग्राही अभिक्रियांमध्ये, पदार्थ उष्णतेच्या रूपात ऊर्जा शोषून घेतो आणि त्याची रासायनिक अभिक्रिया होते. उदाहरण: खाद्यपदार्थ तयार करताना शोषलेली ऊर्जा, जसे केक बनविताना.

उष्मादायी अभिक्रियांमध्ये उष्ण-ऊर्जा मुक्त होते. फटाक्यांचे फुटणे ही उष्मादायी अभिक्रिया आहे.

रासायनिक बदलामुळे पदार्थाची ओळख आणि गुणधर्म बदलतात आणि त्यांना परत आणणे शक्य असते किंवा नसते.

हवेत मॅग्नीशियमचे प्रज्वलन

मॅग्नीशियम हे अल्कधर्मी पृथ्वी धातू आहे, आणि त्याचे चिन्ह Mg आहे. हा चंदेरी पांढरा धातू आहे. मॅग्नीशियम पटकन प्रज्वलित होते आणि पावडर रूपात किंवा पट्टी रूपात जळू शकते. मॅग्नीशियम जळताना हवेतून ऑक्सिजन घेते आणि मॅग्नीशियम ऑक्साइड निर्माण करते जे अल्कधर्मी असते.

सोडियम सल्फेट आणि बेरीयम क्लोराइड मधील अभिक्रिया

जेव्हा त्यांच्या जलयुक्त रूपात सोडियम सल्फेट आणि बेरीयम क्लोराइड यांची अभिक्रिया होते, तेव्हा बेरीयम सल्फेटचे एक पांढरे अवक्षेपण निर्माण होते, जे पाण्यात अविद्राव्य असते. ह्या अभिक्रिये मध्ये सोडियम क्लोराइड पण निर्माण होते पण ते पाण्यात विरघळल्यामुळे दिसत नाही. बेरीयम सल्फेटचे अवक्षेपण विरल HCl मध्ये अविद्राव्य असते.

इथे, निर्माण झालेले पदार्थ हे त्यांचा रासायनिक घटकात आणि रासायनिक गुणधर्मात अभिक्रियाकारकांपेक्षा संपूर्णपणे वेगळे आहेत. म्हणून ही अभिक्रिया एक रासायनिक बदल आहे.

जलयुक्त कॉपर सल्फेट द्रावण आणि लोखंडी खिळे

जेव्हा लोखंडी खिळा कॉपर सल्फेट द्रावणात बुडविला जातो, तेव्हा खिळ्याच्या पृष्ठभागावर तपकिरी आवरण निर्माण होते आणि कॉपर सल्फेट द्रावणाचा रंग निळ्याचा फिकट हिरवा होतो. ही अभिक्रिया सूचित करते की लोह कॉपरपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे आणि ते कॉपरला त्याच्या द्रावणातून विस्थापित करते आणि लोह Fe2+ आयन च्या रूपात द्रावणात मिसळते आणि फेरस सल्फेट द्रावण निर्माण होते.

ही एकेरी विस्थापन अभिक्रिया आहे.

झिंक आणि विरल सल्फ्युरिक आम्ल यांची अभिक्रिया

झिंक हायड्रोजनपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे, आणि ते हायड्रोजनला विरल आम्लातून विस्थापित करते. झिंक आणि विरल सल्फ्युरिक आम्लाची अभिक्रिया होते, आणि झिंक सल्फेट निर्माण होते आणि हायड्रोजन वायु मुक्त होते. ही एकेरी विस्थापन अभिक्रिया आहे ज्यात एक धातू एका अ-धातूला विस्थापित करते.

निर्माण झालेले पदार्थ ZnSO4 आणि H2 (वा.) यांचे रासायनिक घटक आणि रासायनिक गुणधर्म हे अभिक्रियाकारक Zn आणि H2SO4 पेक्षा संपूर्णपणे वेगळे आहे. म्हणून ही अभिक्रिया एक रासायनिक बदल आहे.

कॉपर सल्फेट गरम करणे

कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट मध्ये प्रत्येक १ मोल कॉपर (II) सल्फेट साठी ५ मोल पाणी असते. ह्याचे सूत्र CuSO4.5H2O असे लिहिल्या जाते. जेव्हा हे खूप गरम केले जाते तेव्हा त्याचे अॅनहायड्रस कॉपर सल्फेट निर्माण होते. कॉपर सल्फेट चा निळा रंग पाण्यामुळे असतो. गरम केल्यावर, ~६३०से. ला दोन पाण्याचे रेणु निघून जातात आणि ~१०९०से. ला अजून दोन रेणु निघतात, आणि शेवटचा रेणु ~२०००से. ला निघतो. मग पांढरे अॅनहायड्रस कॉपर सल्फेट निर्माण होते

वरची प्रक्रिया उलटी पण होऊ शकते. जेव्हा अॅनहायड्रस कॉपर सल्फेट मध्ये पाणी घातले जाते, त्याचा रंग परत निळा होतो, म्हणजे निळ्या रंगाचे कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट परत निर्माण होते. म्हणून हा व्युत्क्रमी रासायनिक बदल आहे.

अजून पुढे गरम केल्यावर ~६५००से ला अॅनहायड्रस कॉपर सल्फेट याचे विघटन होते आणि कॉपर ऑक्साइड (CuO) आणि सल्फर ट्रायऑक्साइड निर्माण होतात, आणि ही अभिक्रिया व्युत्क्रमी नसते.

Similar questions