१.खाली दिलेल्या विषयावर १० ते १२ ओळींचा निबंध लिहा.
माझा आवडता मैत्रीण.
Answers
Answer:
असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीचे मित्र राहत नाही, तो सर्वात दुर्भाग्यशाली असतो. आणि असेही म्हणतात की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. खरे मित्र मैत्रीण नेहमी एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतात. खरे मित्र बनवले जात नाहीत तर ते स्वभावानेच बनून जातात.
जीवनाच्या प्रवासात माझी भेट अशाच एका खऱ्या मैत्रिणीशी झाली. माझ्या प्रिय मैत्रिणीचे नाव आहे निकिता. निकिता आणि मी एकाच वर्गात शिकतो. आम्ही दोघी जवळपास पाचव्या इयत्तेपासून एकामेकांच्या प्रिय मैत्रिणी आहोत. निकिता चे घर आमच्या घरापासून थोड्या अंतरावर आहे. पण तरीही ती दररोज शाळेत जाण्यासाठी माझी वाट पाहते. आणि मग मी आली की आम्ही दोघे सोबतच शाळेत जातो. निकिता आणि मी एकाच बाकावर बसतो. परंतु शाळेत असताना आम्ही विनाकारण कधीही गप्पा मारीत नाहीत. शिक्षक काय शिकवता त्याकडे आमचे संपूर्ण चित्त असते.
घरी आल्यावर निकिता आणि मी आमच्या घराच्या गच्चीवर थोडे फार खेळतो व सोबत बसूनच अभ्यास करतो. निकिता चे वडील सरकारी कार्यालयात कामाला आहेत. ज्यामुळे आम्ही दोघीही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. निकिता एका खऱ्या मैत्रिणीचे कर्तव्य पुरेपूर सांभाळते. ती मला प्रत्येक ठिकाणी मदत करते. मी देखील तिला काहीही काम असले कि साहाय्य करते. निकिताचा स्वभाव खूप शांत आहे. आमच्या वर्गातील मुलींमध्ये सर्वात हुशार विद्यार्थीनी माझी मैत्रीण निकिताच आहे.