History, asked by suvarnachopdar91, 16 days ago

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा ​

Answers

Answered by vaishnavibarad8
12

Answer:

खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध घनिष्ठ आहेत.

१) खेळांवर लिखाण करणाऱ्या लेखकांना त्या खेळांचा इतिहास माहित असावा लागतो.

२) खेळाची समीक्षा करण्यासाठी त्या समिक्षकला भूतकाळातील खेळाडूंच्या खेळाचे कौशल्य माहित असावे लागते.ओलंपिक, एशियाड, राष्ट्रकुल अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांची माहिती, खेळाडूंची वैशिष्ट्ये असा संदर्भ देण्यासाठी समिक्षकाला इतिहासाचा आधार घ्यावाच लागतो.

३) विविध स्पर्धांचे आकाशवाणीवरून, दूरदर्शनवरून वा वाहिन्यांवरून समालोचन करताना समालोचकाला त्या खेळाचा इतिहास, गाजलेले खेळाडू, त्यांचे विक्रम इत्यादींसंबंधी माहिती द्यावी लागते, तरच त्याचे समालोचन रंजक होते.

४) खेळातील विशेष तज्ञ म्हणून बोलावलेल्या व्यक्ती, खेळाडूंचा प्रशिक्षणासाठी असणारे प्रशिक्षक, स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड करणारी समिती या सर्वांना खेळाडूंची माहिती, त्यांचे गुण व दोष,विरुद्ध चमूतील खेळाडूंचा इतिहास या सर्वांचा अभ्यास करावा लागतो.

५) खेळाडूंनाही आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा इतिहास माहित असावा लागतो. थोडक्यात, खेळाशी संबंधित सर्व घटकांना खेळाचा इतिहास माहित करून घ्यावाच लागतो.

Explanation:

This is your answer

Answered by manishabansode404
3

Explanation:

please make me as brilliant.

Attachments:
Similar questions