खेळांचे महत्त्व स्पष्ट करा.
Answers
खेळाचे महत्व
व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने शारीरिक क्षमता म्हणजे फक्त श्रम नव्हे तर कोणत्याही व्यवसायात दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहण्याची क्षमता. व्यक्तीचे आरोग्य चांगले असेल तरच हे होऊ शकते. याचाच अर्थ आरोग्य हा व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग आहे.
चांगले आरोग्य म्हणजे कोणत्याही प्रसंगी व कोणत्याही वातावरणात न थकता दीर्घकाळ काम करण्याची क्षमता. हे काम शारीरिक किंवा बौध्दिक श्रमाचे असू शकते. विेक्रेत्याला भरपूर फिरण्याकरिता शारीरीक क्षमतेची गरज असते, तर कार्यालयातील लेखापलकाकडे एका जागी बसून दीर्घकाळापर्यंत बौध्दिक श्रम करण्याची क्षमता असली पाहिजे.
दीर्घकाळपर्यंत काम करण्याच्या क्षमतेतून व्यक्ितमध्ये आत्मविश्र्वास निर्माण होतो. चांगल्या व्यक्तिमत्वाकरिता आत्मविश्र्वास हा एक मूलभूत गुण आहे. याशिवाय निरोगी शरीरामुळे मनाची एकाग्रतासुध्दा टिकून राहते व व्यक्ती त्या कामात कार्यकुशल बनते. याचाच अर्थ चांगले आरोग्य व्यक्ितमध्ये आत्मविश्र्वास व मनाची एकाग्रता निर्माण करते.
आरोग्य जोपासण्यासाठी व्यक्ितने नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करुन परिस्थितीनुसार कोणताही व्यायाम केला तरी चालू शकतो. त्यासाठी व्यायाम शाळेतच गेले पाहिजे असे नाही तर चालणे, पळणे, योगासने इत्यांदी साध्या व सोप्या व्यायामाने सुध्दा शारीरिक क्षमता निर्माण होते. लोकमान्य टिळकांसारख्या महान व्यक्ितने सुध्दा आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन एक वर्ष फक्त शरीर कमावण्यासाठी खर्च केले होते.
चांगल्या शरीरदृष्टीमुळे व्यक्तीचे बाहयस्वरुप सुध्दा खूलून दिसते. चांगली शरीरयष्टी असणार्या व्यक्ितला कोणताही पोषाख चांगला दिसतो. व समोरच्या व्यक्तिवर त्याचा प्रभाव पडतो. नीटनेटका व चांगला पोषाख हा सुध्दा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे.
वरील सर्व गोष्टी पाहता शारीरिक क्षमतेसाठी नियमीत व्यायाम करणे अतिशय गरचेचे आहे.
1
they make us healthy prevent us from diseases improve our immune system and make our body fit