History, asked by shashwatsnthakur, 9 months ago

खेळाचे महत्व लिहा ( थोडक्यत उत्तरे लिहा )

Answers

Answered by shubhangirane199
3

Answer:

आज भारतीयांच्या जीवनात खेळांना महत्त्व आले आहे. आजकाल खेळाविषयीचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलू लागला आहे; पण काही वर्षांपूर्वी खेळण्यात वेळ घालवणारे मूल हे अवलक्षणी समजले जायचे. इतकेच काय, एखादयाने 'खेळ' हे आपले जीवनध्येय (करिअर) करायचे ठरवले, तर त्याला 'भिकेचे डोहाळे' लागले असे मानले जायचे.आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदृढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागली आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो, हे उमगल्यावर त्यांना खेळ हवेहवेसे वाटू लागले.लहानपणी आपला बराचसा वेळ हा खेळण्यात जातो; पण लहानपणचे बहुतेक खेळ हे गमतीखातर खेळले जातात. त्यांत कोणतीही शिस्त नसते. बालपण हे फुलपाखरासारखे असते. जेव्हा बालपण संपते, शैशवही ओलांडले जाते आणि कुमारावस्था प्राप्त होते, तेव्हा शिस्तीची आवश्यकता निर्माण होते. जीवनातील सर्वच क्षेत्रांत शिस्त अनिवार्य आहे, तशी ती खेळांतही आवश्यक असते.

Similar questions