Hindi, asked by jaynaikwadi, 6 months ago

खेळाचा तुमच्या मते असलेला फायदा समजावून सांगा.​

Answers

Answered by preetamhiremath
12

Answer:

आज भारतीयांच्या जीवनात खेळांना महत्त्व आले आहे. आजकाल खेळाविषयीचा दृष्टिकोन थोडा थोडा बदलू लागला आहे; पण काही वर्षांपूर्वी खेळण्यात वेळ घालवणारे मूल हे अवलक्षणी समजले जायचे. इतकेच काय, एखादयाने 'खेळ' हे आपले जीवनध्येय (करिअर) करायचे ठरवले, तर त्याला 'भिकेचे डोहाळे' लागले असे मानले जायचे.

आज खेळातूनही पैसा मिळू शकतो, हे पाहून काही लोक तो आपल्या करिअरचा भाग करतात; पण त्याचबरोबर खेळाचे इतर फायदेही आज आपणाला उमगले आहेत. निकोप शरीरातच निकोप मन असू शकते, हे उमगल्यावर शरीर निकोप, सुदृढ ठेवण्यासाठी माणसे धडपडू लागली आणि निकोप शरीराचा एक मार्ग खेळाच्या पटांगणातून जातो, हे उमगल्यावर त्यांना खेळ हवेहवेसे वाटू लागले.

Answered by Anonymous
3

ब्राझीलमधील ‘रियो दि जानेरो’ या शहरामध्ये नुकत्याच ३१व्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. मागच्या लेखात आपण नुकत्याच झालेल्या स्पर्धेचा आढावा घेतला. आज आपण या खेळांच्या महामहोत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेऊया

ऑलिम्पिक स्पर्धांचा इतिहास फार जुना आहे. प्राचीन ग्रीक साम्राज्यामध्ये या स्पर्धा दर चार वर्षांनी घेण्यात येत. पहिल्या प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धा इ.स. पूर्व ७७६मध्ये घेण्यात आल्या. ह्या स्पर्धा ग्रीक देव ‘झीयस’ यांच्या सन्मानार्थ (आठवण) म्हणून ऑलिंपिया या शहरात घेण्यात येत. म्हणून या स्पर्धांना ऑलिम्पिक म्हणण्यात येते. इ. स. ३९३च्या जवळपास या स्पर्धा बंद पडल्या.

आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धाची सुरुवात इ.स. १८९६मध्ये अथेन्स (ग्रीस) येथे करण्यात आली यामध्ये १४ देशांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला. आधुनिक ऑलिम्पिक सुरू करण्याचे श्रेय हे फ्रेंच इतिहासकर व शिक्षणतज्ज्ञ ‘प्येर दी कुर्बेर्ती’ यांना जाते. ते ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती’चे संस्थापक होते. त्यामुळे ‘कुर्बेर्ती’ यांना आधुनिक ऑलिम्पिकचे जनक मानले जाते. या स्पर्धेचे अयोजन दर चार वर्षांनी करण्यात येते.

आता सुमारे २०० देश या स्पर्धात भाग घेतात. (म्हणजे सगळेच देश) उन्हाळी ऑलिम्पिकच्या धर्तीवर सन १९२४पासून हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात फ्रान्सच्या शॅमोनी या शहरात झाली. हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांचे सुद्धा दर चार वर्षांनी आयोजन केले जाते. १९९४पासून उन्हाळी व हिवाळी ऑलिम्पिक वेगळे भरवले जाते. अशा प्रकारे की ज्यामुळे दर दोन वर्षांनी एक असते. २२व्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा २०१४ला ‘सोत्शी’ येथे (रशिया) भरविण्यात आल्या होत्या. २३व्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा प्यॉगचँग, दक्षिण कोरिया येथे भरवण्यात येतील.

ज्या शहरात खेळांचे आयोजन होते त्या शहराच्या नावे त्या वर्षीच्या स्पर्धा ओळखल्या जातात. सन १९१६,१९४० व १९४४च्या ऑलिम्पिक स्पर्धा पहिल्या व दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द करण्यात आल्या. आजतायागत अमेरिका या देशाने तब्बल चारवेळा ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आहे.

(१९०४ - सेंट लुईस, १९३२ - लॉस एंजेल्स, १९८४ - लॉस एंजेल्स, १९९६ - अॅटलांटा) तर ‘लंडन’ या शहराने तब्बल तीन वेळा (१९०८, १९४८, २०१२) यजमानपद स्वीकारले आहे. आजतयागत ३१वेळा उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. ३२व्या ऑलिम्पिक स्पर्धा, २०२० साली टोकीयो (जपान) येथे घेण्यात येतील.

सिटीयस, अल्टीयस, फोटीयस म्हणजे जलद, उंच व मजबूत हे ऑलिम्पिकचे घोषवाक्य आहे. खेळांना स्वतःचे गीत व सॅल्यूटदेखील आहे.

ऑलिम्पिक ध्वज हा पांढऱ्या रंगाचा असून, त्यात एकमेकांत गुंतलेली पाच वर्तुळे आहेत. ही पाच वर्तुळे (वर - निळा, काळा, लाल), (खाली- पिवळा व हिरवा) या पाच रंगांची आहेत. ही पाच वर्तुळे म्हणजे जगातील पाच खंड असे म्हटले जाते. परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने असे स्पष्ट केले आहे की, ही पाच वर्तुळे कुण्या खंडांची नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करतात.

Similar questions